Saturday, April 20, 2024

.. म्हणून श्रीदेवीसाठी रेखा करत होत्या डबिंग, जाणून घ्या हवा-हवाईच्या करीअरचा तो किस्सा

बॉलिवूडमधील पहिली महिला सुपरस्टार म्हणून श्रीदेवी (shridevi) यांची ओळख आहे. वयाच्या केवळ ५४ व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या आठवणी आजही त्यांच्या चाहत्यांच्या मनात जिवंत आहेत. त्यांनी ‘नगिना ‘, ‘चांदणी’, ‘मिस्टर इंडिया’, ‘इंग्लिश विंग्लिश’ आणि ‘मॉम’ यांसारख्या आणि ब्लॉकबस्टर चित्रपटात काम केले आहे. अशातच शनिवारी (१३ ऑगस्ट ) रोजी श्रीदेवी यांचा स्मृतीदिन आहे. चला या निमिताने जाणून घेऊया एक खास किस्सा.

श्रीदेवी (shridevi) यांचा जन्म १३ ऑगस्ट १९६३ मध्ये तामिळनाडू येथे एका छोट्याश्या गावात झाला होता. त्यांचे वडील आय्यापन हे एक वकील होते, तर आई राजेश्वरी एक गृहिणी होत्या. त्यांनी वयाच्या केवळ चौथ्या वर्षी तमिळ चित्रपटात काम करण्यास सुरुवात केली होती.

श्रीदेवी यांना त्यांच्या करिअरच्या सुरुवातीला नीट हिंदी बोलता येत नव्हते. त्यामुळे त्यांच्या बहुतेक चित्रपटात डबिंग केले जात होते. त्याच्या १९८६ साली प्रदर्शित झालेला ‘आखिरी रास्ता’ या चित्रपटात रेखा यांनी श्रीदेवीसाठी डबिंग केले होते. त्यांनी १९८९ साली आलेल्या ‘चांदणी’ या चित्रपटानंतर त्यांचा आवाज डब करण्यास सुरुवात केली होती.

‘नगिना’ आणि ‘चांदणी’ हे श्रीदेवी यांचे सुपरहिट चित्रपट आहेत. परंतु खूप कमी लोकांना ही गोष्ट माहित असेल की, या दोन्ही चित्रपटांसाठी श्रीदेवी या निर्मात्यांची पहिली निवड नव्हत्या. ‘चांदणी’ या चित्रपटाची ऑफर सुरुवातीला रेखा यांना दिली होती, तर ‘नगीना’ चित्रपटाची ऑफर जया प्रदा यांना दिली होती.

श्रीदेवी यांचा १९८९ मध्ये आलेला ‘चालबाज’ या चित्रपटातील ‘किसीके हात न आयेगी ये लडकी’ हे गाणे खूप गाजले होते. हे गाणे शूट करताना श्रीदेवी यांना १०३ डिग्री ताप होता, तरी देखील पावसात त्यांनी या गाण्याची शूटिंग केली होती.

त्यांचा ‘सदमा’ हा चित्रपट १९८३ मध्ये प्रदर्शित झाला होता. ह्यात श्रीदेवीसोबत कमल हासन मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपटातील त्यांच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते.
‘सदमा’ आणि ‘चांदणी’ या चित्रपटात तिने अभिनयासाठी गाणे देखील गायले आहे. त्यांनी त्यांच्या करीअमध्ये तब्बल २०० चित्रपटात काम केले. यात ६३ हिंदी चित्रपट, ५८ तमिळ चित्रपट, ६२ तेलुगू चित्रपट आणि २१ मल्याळम चित्रपटांचा समावेश आहे. त्यांनी १९७८ मध्ये आलेल्या ‘सोलवा सावन’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. परंतु ‘हिम्मतवाला’ या चित्रपटातून त्यांना खरी ओळख मिळाली.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा :

हे देखील वाचा