Saturday, June 21, 2025
Home बॉलीवूड जेव्हा ४ वर्षाचे रिलेशन तोडून गर्लफ्रेंडने तोडले होते नाते, सिद्धांत चतुर्वेदीने सांगितली त्याच्या आयुष्यात ती घटना

जेव्हा ४ वर्षाचे रिलेशन तोडून गर्लफ्रेंडने तोडले होते नाते, सिद्धांत चतुर्वेदीने सांगितली त्याच्या आयुष्यात ती घटना

बॉलिवूड अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी नुकतेच प्रदर्शित झालेल्या त्याच्या ‘गहेराईया’ या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. दीपिका पदुकोणसोबतची त्याची केमेस्ट्री सगळ्यांना खूप आवडली. सगळीकडे सध्या त्याच्या नावाचे कौतुक होत आहे. सिद्धांत चतुर्वेदी त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील खूप चर्चेत आहे. त्याने त्याच्या लव्ह लाईफबद्दल देखील सांगितले. त्याने सांगितले की, फिल्म इंडस्ट्रीमध्ये येण्याआधी तो एका मुलीसोबत सिरियस रिलेशनमध्ये होता.

सिद्धांत सध्या त्याच्या ‘गहेराईया’ चित्रपटाचे यश एन्जॉय करत आहे. या चित्रपटात त्याने जैन ही भूमिका साकारली आहे. बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्याआधी तो सीए बनण्यासाठी तयारी करत होता. ‘गल्ली बॉय’, ‘बंटी और बबली २’ नंतर सिद्धांत चतुर्वेदीचा हा तिसरा चित्रपट आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत दीपिका पदुकोण आणि अनन्या पांडे मुख्य भूमिकेत आहेत.

सिद्धांत चतुर्वेदीने एका मुलाखतीत त्याच्या लव्ह लाईफ बद्दल सांगितले की, कशाप्रकारे एका घटनेने त्याचे संपूर्ण आयुष्य बदलून गेले. सिद्धांतने सांगितले की, “जेव्हा मी २० वर्षाचा होतो. मला माझ्या नात्यावर खूप विश्वास होता. परंतु मला धोका मिळाला. मी त्या मुलीसोबत ४ वर्ष रिलेशनमध्ये होतो. मला तिच्यासोबत सेटल व्हायचे होते.”

त्याने पुढे सांगितले की, “मला तिच्यासोबत राहायचे होते आणि तिला एक साधं आयुष्य पाहिजे होत. परंतु की माझे करीअर बदलण्याचा निर्णय घेतला आणि तिला माझा हा निर्णय आवडला नाही. आम्हाला दोघांना वेगळे जगायचे होते आणि हे आमच्यासाठी खूप कठीण होते. कारण मला प्रेम आणि करीअर यामध्ये काहीतरी एक निवडायचे होते. म्हणून मी माझे स्वप्न निवडले.”

त्याने सांगितले की, “मला अजूनही आठवत आहे की, मी तिला म्हणालो होतो की, मला स्टेजवर परफॉर्म करायचे आहे. मी ते करणार आणि आज मी तिथेच आहे.” सिद्धांतच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तो आगामी ‘फोन भूत’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात कॅटरिना कैफ आणि ईशान खट्टर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तसेच तो ‘खो गये हम कहा’ या चित्रपटात देखील दिसणार आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा