Sunday, May 19, 2024

जेव्हा स्वतःला बकवास अभिनेत्री म्हणत ईशा कोप्पीकरने केली होती स्वतःवरच टीका, वाचा ‘तो’ किस्सा

ईशा कोपीकर ही बॉलिवूडमधील तिच्या दमदार अभिनयामुळे प्रसिद्ध आहे. तिने तिच्या अभिनयाची सुरूवात दाक्षिणात्य सिनेमातून केली होती. त्यानंतर तिने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला होता. ती तिच्या आयटम नंबर ‘खल्लास’ मुळे जास्त गाजली होती. लोक तिला ‘खल्लास गर्ल’ या नावानी ओळखतात. परंतु तिने आता स्वत:ला बॉलिवूडपासुन दूर ठेवले आहे. माध्यमातील वृत्तानुसार तिला बॉलिवूडमध्ये कमबॅक करायचे आहे. त्याआधी तिने स्वत:ला बॉलिवूडपासुन का दूर  ठेवले याचा खुलासा केला होता. आणि स्वत:ला बॉलिवूडमधील बकवास मुलगी असल्याच घोषित केले होते. आज (19, सप्टेंबर ) ईशा तिचा वाढदिवस साजरा करत आहे. जाणून घेऊया तिचा हा गाजलेला किस्सा. 

विशेष म्हणजे आता सात वर्षाची असलेली मुलगी रियाना हिच्यामुळे ईशा बॉलिवूडपासुन दूर ठेवल्याचा अंदाज लावला जात होता, अभिनेत्रीने हे आरोप फेटाळून लावले आहेत आणि चित्रपटापासुन दूर राहण्याचे खरे कारण सांगितले. ईशाचे लग्न टिमी नारंंग यांच्यासोबत झाले आहे. चित्रपटाव्यतिरिक्त ईशा वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चत असते. ‘फिजा’,‘ डरना मना है’, ‘कयामत’, ‘दिल का रिश्ता’, ‘पिंजर’, ‘मैंने प्यार क्यू किया’, ‘डॉन’ आणि ‘कृष्णा कॉटेज’ यांसारख्या चित्रपटात तिने काम केले आहे.

माध्यमांशी बोलताना तिने स्वत:ला बकवास अभिनेत्री म्हणून संबोधले. ती म्हणते की, “मी एक बकवास अभिनेत्री आहे असा माझा गैरसमज होता. म्हणूच मला काही प्रोजेट्क्ट सोडावे लागले. मी माझ्या कामासाठी येथे आहे. मला तू आवडत असेल तर मी तुझ्याशी बोलेन, तू माझ्या भावनांशी खेळास तर तुला शुभेच्छा. माझ्या या वृत्तीमुळे बरेच प्रोजेक्ट माझ्या हातातून गेले.

तिने बॉलिवूडमध्ये होणाऱ्या नेपोटिज्म कास्टिंग काऊचबद्दलही तिचे अनुभव शेअर केले. ती म्हणते की, “मला एका चित्रपटाच्या निर्मात्याने एकटे भेटायला सांगितले आणि मी तीऑफर नाकारली. त्यानंतर मी चित्रपटातून बाहेर गेली तिने खुलासा केला की, साल २००० च्या दशकाच्या मध्यात मला एका प्रसिद्ध निर्मात्याने बोलावले आणि सांगितले की, तुला हिरोच्या चांगल्या पुस्तकांमध्ये असणे आवश्यक आहे. मला याचा अर्थ मला माहित नव्हता म्हणून मी हिरोला कॅाल केला. म्हणून, मी हिरोला फोन केला आणि त्याला मला एकट्याला भेटायला सांगितले त्यावेळी त्या व्यक्तीवर फसवणूक केल्याचा आरोप होत असल्याने त्याने मला त्याच्या कर्मचाऱ्यांना सोडून त्याला भेटण्यास सांगितले.

ईशा पुढे म्हणते की, मी दिग्दर्शकाला फोन केला आणि आणि सांगितले की, मी माझ्या टॅलेंटमुळे आणि लूकमुळे येथे आले आहे आणि जर मला त्यातून चांगले काम मिळाले तर ठीक आहे. त्यानंतर मला चित्रपटातून बाहेर फेकण्यात आले होते.”

अशाप्रकारे तिने तिचा अनुभव शेअर केला आहे. तसेच ती पुन्हा बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे हे ऐकून देखील तिच्या चाहत्यांना खूप आनंद झाला आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा- आपल्या आवाजाने तरुणांच्या मनावर राज्य करणारे लकी अली तीन लग्न होऊनही राहिले ‘अनलकी’
‘या’ अभिनेत्रींची एमएमएस लीक झाल्याने उडाली होती खळबळ; थेट करिअरवर झाला होता परिणामनेहा कक्करच्या बोल्ड लूकवर संतापले नेटकरी; म्हणाले, ‘बाई तुझा डिझायनर …’

हे देखील वाचा