अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी त्यांच्या एका ट्वीटने त्यांच्या चाहत्यांची चिंता वाढवली आहे. त्यांच्या नुकत्याच केलेल्या ट्वीटमध्ये, त्यांनी हार्ट आणि हात दुमडलेल्या इमोजीसह लिहिले की, “हृदयाचे ठोके वाढत आहेत…चिंताजनक… आणि आशा आहे की सर्व काही ठीक होईल.” अमिताभ यांचे हे ट्वीट पाहून त्यांचे चाहते अस्वस्थ झाले. चाहत्यांना आता त्यांच्या आवडत्या स्टारच्या तब्येतीची चिंता लागली आहे.
अमिताभ बच्चन यांच्याबद्दल हे सर्वज्ञात आहे की, ते सोशल मीडिया प्रेमी आहेत. चित्रपटांसोबतच ते सोशल मीडियावरही खूप सक्रिय असतात. अनेकदा ते त्यांच्या ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम आणि वैयक्तिक ब्लॉगवरून त्यांच्या आगामी प्रोजेक्ट्स, फोटो आणि कथांसह, त्यांचे आरोग्य आणि त्यांचे सुख-दु:खही चाहत्यांसोबत शेअर करत असतात. (amitabh bachchan explains about the stress of shooting and the concern says heart pumping)
T 4205 – heart pumping .. concerned .. and the hope ..????❤️
— Amitabh Bachchan (@SrBachchan) February 27, 2022
चाहत्यांनाही त्यांच्या या वेगळेपणाची आवड आहे आणि म्हणूनच अभिनेत्याची कोणतीही पोस्ट लगेचच व्हायरल होते. अभिनेत्याने शेअर केलेली प्रत्येक पोस्ट त्यांचे चाहते खूप गंभीरतेने घेतात आणि त्यावर भरभरून प्रतिक्रियाही देतात. असेच काहीसे त्यांच्या नुकत्याच समोर आलेल्या पोस्टमध्ये पाहायला मिळाले, जेव्हा त्यांनी काही ओळींमध्ये त्यांच्या तब्येतीबद्दल माहिती दिली.
अमिताभ बच्चन यांनी रविवारी (२७ फेब्रुवारी) रात्री त्यांचे लेटेस्ट ट्वीट केले, ज्यामध्ये त्यांनी त्यांच्या चिंता, त्रास आणि आशांबद्दल लिहिले. मात्र, त्यांच्या या ट्वीटमुळे चाहत्यांची चिंता वाढली आहे. त्यांच्या तब्येतीबद्दल चाहते बरेच चिंतेत आहेत. चाहते त्यांना आराम करण्याचा आणि स्वत:ला सुरक्षित ठेवण्याचा सल्ला देत आहेत.
आपल्या चाहत्यांना चिंतेत पाहून, अमिताभ यांनी त्यानंतर ब्लॉग पोस्ट केला. ज्यात त्यांनी सांगितले की, त्यांचे ट्वीट शूटिंगच्या तणाव आणि आगामी फुटबॉल सामन्याबद्दल चिंता आणि आशाबद्दल होते, जिथे त्यांचा आवडता संघ चेल्सी खेळत होता. दिनचर्या शेअर करण्यासोबतच, त्यांनी सांगितले की, ते कसे संध्याकाळी ५.३० पर्यंत शूटिंग करत होते आणि मग रात्री ८.३० वाजता मड आयलंडवरून त्याच्या घर जलसाकडे निघाले. म्हणजेच आता बिग बींच्या पोस्टवरून स्पष्ट झाले आहे की, त्यांची तब्येत ठीक आहे.
हेही वाचा –
- राणी चॅटर्जीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा मिळाला पुरस्कार, बांगड्या-बिंदीने बनवला अभिनेत्रीने पारंपारिक लूक
- टेलिव्हिजन रियॅलिटी शो स्मार्ट जोडी मधील ‘या’ सेलिब्रिटी जोडीला मिळते सर्वात जास्त मानधन
- जेव्हा लोक रेमो डिसूझाला ‘कालिया’ म्हणायचे तेव्हा यायचा खूप राग, आईच्या ‘या’ गोष्टीने बदलली विचारसरणी