Saturday, April 20, 2024

टेलिव्हिजन रियॅलिटी शो स्मार्ट जोडी मधील ‘या’ सेलिब्रिटी जोडीला मिळते सर्वात जास्त मानधन

टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये अनेक वेगवेगळे रियॅलिटी शो असतात. एक संपला की एक असे सतत या रियॅलिटी शो चालू असतात. या रियॅलिटी शोचे मोठे मार्केट आहे. प्रेक्षकांना देखील हे मर्यादित दिवसांचे रियॅलिटी शो खूप आवडतात. हे रियॅलिटी शो लोकप्रियता आणि प्रसिद्धीच्या बाबतीत मोठमोठया मालिकांना देखील मागे टाकतात. अनेक अपयशी होणाऱ्या कलाकारांसाठी देखील रियॅलिटी शो एक वरदान आहे. सुरुवातीला हे कितीही वेगळे वाटणारे रियॅलिटी शो नंतर एकसारखेच वाटायला लागतात. असे असले तरी ते गाजतात हे नक्की. अशा या रियॅलिटी शोच्या गर्दीत नुकताच एक नवीन रियॅलिटी शो सुरु झाला आहे ‘स्मार्ट जोडी.’ स्टार प्लसवर नुकताच या शोच्या पहिला भाग ऑन एयर झाला. या शोमध्ये बॉलिवूड आणि टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील अनेक गाजलेल्या आणि सुपरहिट जोड्या पाहायला मिळत आहे. अगदी अभिनेत्री भाग्यश्री, अंकिता लोखंडेपासून ते क्रिकेटर श्रीकांतपर्यंत वेगवेगळे सेलिब्रिटी आपल्याला शो मध्ये दिसणार आहे. या सर्व सेलिब्रिटींना या शोसाठी चॅनेलने बक्कळ रक्कम देऊ केली आहे. या लेखातून जाणून घेऊया कोणत्या सिलेब्रिटीला किती पैसे दिले जात आहे याबद्दल.

अभिनेत्री भाग्यश्री आणि हिमालय दासानी :
मैने प्यार किया सिनेमातून रातोरात सुपरस्टार झालेली अभिनेत्री भाग्यश्री (Bhagyashree) तिच्या नवऱ्यासोबत हिमालय दासानीसोबत (Himalay Dassani) या शोमध्ये दिसणार आहे. एका माहितीनुसार या शोसाठी याच जोडीला सर्वात जास्त पैसे दिले जात आहे. प्रत्येक भागासाठी भाग्यश्री आणि हिमालयला १० लाख रुपये दिले जाणार आहे.

अंकिता लोखंडे आणि विकी जैन :
टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री असलेली अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) देखील तिच्या पतीसोबत विकी जैनसोबत (Vicky Jain) शोमध्ये स्पर्धक आहे. या दोघांना या शोसाठी सात लाख रुपये प्रत्येक भागासाठी दिले जाणार आहे.

अर्जुन बिजलानी आणि नेहा :
टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील हँडसम अभिनेता असलेला अर्जुन बिजलानी (Arjun Bijlani) त्याच्या पत्नीसोबत नेहासोबत या शोमध्ये दिसणार आहे. या दोघांना एका भागासाठी सात लाख रुपये देण्यात येणार आहे.

ऐश्वर्या शर्मा आणि नील भट्ट :
प्रसिद्ध टीव्ही मालिका असलेल्या ‘गुम है किसी के प्यार में’ मुख्य जोडी अर्थात ऐश्वर्या शर्मा आणि नील भट्ट देखील या शोमध्ये स्पर्धक म्हणून आले आहे. या दोघांना या शोच्या एका भागासाठी पाच लाख रुपये देण्यात येत आहे.

क्रिकेटर कृष्णमाचारी श्रीकांत आणि विद्या श्रीकांत :
टीम इंडियाचे माजी क्रिकेटर असणारे कृष्णमाचारी श्रीकांत (Kris Srikkanth) त्यांच्या पत्नीसोबत विद्यासोबत शोमध्ये दिसणार आहे. त्यांना एका भागासाठी चार लाख रुपये देण्यात येणार आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा