Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूवर व्यक्त झाले अंकिता लोखंडे आणि विकी जैन; म्हणाले ‘आमच्या नात्याची…’

बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या (Sushant Singh Rajput) अकाली मृत्यूने त्याच्या चाहत्यांना आणि इतरांनाही हादरवून सोडले होते. सुशांतच्या आकस्मिक निधनाच्या बातमीने अभिनेत्री अंकिता लोखंडेसह (Ankita Lokhande) त्याच्या सर्व जवळच्या व्यक्तींना मोठा धक्का बसला होता. अंकिता लोखंडे देखील एकेकाळी दिवंगत अभिनेत्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती. अंकिता आणि सुशांत फार पूर्वीपासून वेगळे झाले असले तरी सुशांतच्या मृत्यूने त्यांना त्यांच्या कुटुंबाच्या जवळ आणले. सुशांतच्या मृत्यूवरही अंकिताने न्याय मिळवण्यासाठी लढा दिला. आता अंकिताचे लग्न विकी जैनसोबत (Vicky Jain) झाले आहे. अलिकडेच दोघेही ‘स्मार्ट जोडी’ या शोमध्ये सहभागी झाले आहेत.

शोमध्ये अंकिता आणि विकीने सुशांत सिंग राजपूतचे नाव न घेता, त्याचा मृत्यू त्यांच्या नात्याची सर्वात कठीण परीक्षा कशी होती हे सांगितले. याबाबत बोलताना अंकिता म्हणाली की, “मला आठवत नाही की, मी त्याला एके दिवशी का बोलावले. मला फक्त त्याची गरज होती, ही तर सुरुवात होती. त्यानंतर आम्ही तीन वर्षे एकमेकांना डेट केले.”

अंकिता लोखंडे पुढे म्हणाली की, “यावेळी आम्ही एकमेकांना खूप चांगले समजलो. सर्व चढ-उतार असूनही हा एक चांगला टप्पा आहे.” विकी जैन याच्याकडे बोट दाखवत अंकिता म्हणाली की, “मी सर्वांना सांगू इच्छिते की, प्रत्येकामध्ये पत्नीसोबत उभे राहण्याची क्षमता नसते. कठीण काळात तो माझ्यासोबत होता.”

सुशांत सिंग राजपूत आणि अंकिता लोखंडे यांची पहिली भेट ‘पवित्र रिश्ता’च्या सेटवर झाली होती. दीर्घकाळ टिकलेले हे नाते काही कारणांमुळे तुटले. सुशांतसोबतच्या ब्रेकअपनंतर अंकिताही तुटली होती. पण विकी जैनने तिला साथ देऊन तिचे मन जिंकले.

अंकिता लोखंडे विकी जैनशी लग्न केल्यापासून देखील चर्चेत आहे. लग्नानंतर अभिनेत्री सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय दिसते. अंकिता लोखंडे तिच्या पतीसह तिच्या वैवाहिक जीवनाचा पुरेपूर आनंद घेत आहे. ज्याची झलक ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना देत असते. चाहते देखील तिच्या प्रत्येक पोस्टवर प्रेमाचा वर्षाव करत असतात.

सध्या अंकिता तिच्या नवीन टीव्ही शो ‘स्मार्ट जोडी’मुळे चर्चेत आहे. आतापर्यंत ज्यांनी अंकिताला पडद्यावर पाहिले आहे, त्यांना आता तिचा नवरा विकीही पडद्यावर पाहायला मिळणार आहे. होय, विकी लवकरच ‘स्मार्ट जोडी’मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. या शोचा प्रोमो शेअर करून अंकिताने कॅमेराच्या दुनियेत विकीचे स्वागत केले आहे.

हेही  वाचा –

हे देखील वाचा