साऊथचा सुपरस्टार प्रभास (Prabhas), सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि क्रिती सेनन (Kriti Sanon) अभिनित ‘आदिपुरुष’ हा चित्रपट केवळ बॉलिवूडमध्येच नाही, तर चाहत्यांमध्येही खूप दिवसांपासून गाजत आहे. प्रेक्षक या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत होते आणि २०२२ मध्ये चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या चर्चेवर लोक खूप आनंदी होते. परंतु जेव्हा १२ जानेवारी २०२३ रोजी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली, तेव्हा त्यांच्या आशा धुळीस मिळाल्या. तेव्हापासून चित्रपटाच्या प्रदर्शनाला झालेल्या विलंबाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ज्याबद्दल आता बातमी आली आहे की, हे सर्व वीएफएक्समुळे घडले आहे. साहजिकच चित्रपटात भरपूर ऍक्शन आहे आणि ते दाखवण्यासाठी चित्रपटात भरपूर ग्राफिक्स वापरण्यात आले आहेत.
वीएफएक्सच्या कामामुळे पुढे ढकलली चित्रपटाची डेट
‘आदिपुरुष’ (Adipurush) यावर्षी ११ ऑगस्टला प्रदर्शित होणार असल्याच्या बातम्या जोरात असतानाच, आता आमिर खान (Aamir Khan), करीना कपूरचा (Kareena Kapoor) ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट याच तारखेला प्रदर्शित होणार आहे. ‘आदिपुरुष’ २०२३ मध्ये १२ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. ज्याची घोषणा महाशिवरात्रीच्या दिवशी प्रभास आणि चित्रपट निर्मात्यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरून या कॅप्शनसह केली होती. १२ जानेवारी २०२३ रोजी ‘आदिपुरुष’ जगभरातील ३डी सिनेमांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
यानंतर अनेकांची मनं तुटली. त्यामुळे अनेकांच्या मनात प्रश्न होता की, चित्रपट पूर्ण झाला आहे, मग उशीर का? त्यामुळे अशा परिस्थितीत संबंधित सूत्रांनी चित्रपटाचा वीएफएक्स तयार नसल्याची माहिती दिली आहे. ज्यामध्ये आता आणखी काही काळ जाईल. टी-सीरिजच्या हातात हे विशेष उत्पादन आहे, त्यामुळे त्यांना यात कोणतीही घाई दाखवायची नाही.
असे सांगितले जात आहे की, या चित्रपटाचा वीएफएक्स खूप खास आणि मनोरंजक असणार आहे. स्पेशल इफेक्ट्स तज्ज्ञ ओम राऊत या चित्रपटाचे दिग्दर्शक असून, त्यांनी याआधी अजय देवगणचा ‘तान्हाजी’ हा चित्रपटही बनवला आहे. या चित्रपटातही भरपूर वीएफएक्स काम होते. जे प्रेक्षकांना खूप आवडले. ओम राऊतही हा चित्रपट मोशन कॅप्चर तंत्रज्ञानाने बनवत आहेत. ज्यासाठी टीम जोरदार तयारी करत आहे.
रामायणावर आधारित आहे ‘आदिपुरुष’
‘आदिपुरुष’ हा चित्रपट हिंदू महाकाव्य रामायणावर आधारित आहे. साऊथचा सुपरस्टार प्रभास या चित्रपटात भगवान श्री रामची भूमिका साकारताना दिसणार आहे. तर बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान लंकापती राजा रावणाची भूमिका साकारताना दिसणार आहे. ‘आदिपुरुष’ या चित्रपटात अभिनेत्री क्रिती सेनन सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊत यांनी केले आहे. हा चित्रपट केवळ हिंदीतच नाही तर अनेक भाषांमध्ये चित्रपटगृहात दाखल होणार आहे. ‘आदिपुरुष’ हा चित्रपट जगभरात २० हजार स्क्रीन्सवर प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या चित्रपटाचे मेकिंग बजेट जवळपास ४०० कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे.
हेही वाचा –