Friday, April 19, 2024

मिस्टर परफेक्शनिस्टने ‘झुंड’ चित्रपटातील कामाबद्दल केले आकाश ठोसरचे भरभरून कौतुक, व्हिडिओ झाला व्हायरल

सध्या सर्वत्र अनेक चित्रपट प्रदर्शित होत आहेत. अशातच एका चित्रपटाची सर्वत्र चर्चा चालू आहे. तो चित्रपट म्हणजे अमिताभ बच्चन यांचा ‘झुंड’ चित्रपट. खास गोष्ट म्हणजे या चित्रपटाचे दिग्दर्शन मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी केले आहे. ‘सैराट’ या चित्रपटाच्या भरघोस यशानंतर नागराज मंजुळे यांनी पुन्हा एकदा आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू या कलाकारांना घेऊन नवीन चित्रपट बनवला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला आहे. ट्रेलर पाहून सगळेच अमिताभ बच्चन, आकाश ठोसर यांचे कौतुक करत आहेत. त्यांच्या अभिनयाला दाद देत आहेत.

अशातच बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्टने आकाश ठोसरचे कौतुक केले आहे. आकाश ठोसरने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये बॉलिवूडचा सुपरस्टार आमिर खान त्याचे कौतुक करताना दिसत आहे. यात तो ‘झुंड’ चित्रपटातील सगळ्या कलाकारांना भेटत असतो. जेव्हा आकाश ठोसर येतो, तेव्हा आमिर खान त्याला मिठी मारतो आणि तो त्याचे कौतुक करतो.

https://www.instagram.com/tv/CalsqfwqEuK/?utm_source=ig_web_copy_link

त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ शेअर करून त्याने लिहिले आहे की, “झुंडच्या प्रवासातील एक खास क्षण. माझ्या कामाला दाद दिल्याबद्दल धन्यवाद आमिर खान.” अनेकजण त्यांच्या या व्हिडिओवर कमेंट करून त्यांचे कौतुक करत आहेत.

‘झुंड’ हा एक फुटबॉलवर आधारित असलेला चित्रपट आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन फुटबॉल कोचचे पात्र निभावताना दिसणार आहे. जे गरीब मुलांची फुटबॉलची टीम बनवतात आणि त्यांना फुटबॉल शिकवतात.

या चित्रपटाच ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. यात अमिताभ बच्चन यांचा लूक आणि त्यांचे पात्र सगळ्यांना खूप आवडले आहे. अनेकजण त्यांच्या या पात्राला पसंती दर्शवत आहेत. हा चित्रपट स्लम सॉकरचे संस्थापक विजय बरसे यांच्या जीवनावर आणि घटनांवर आधारित आहे. ज्यांनी फुटबॉलच्या माध्यमातून नागपूरच्या गल्लीतील मुलांना एक नवीन आयुष्य आणि एक नवीन ओळख निर्माण करून दिली. त्यामुळे त्यांचा हा चित्रपट पाहण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. त्यांचा झुंड हा चित्रपट येत्या ४ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा