सध्या चित्रपटातील कामापेक्षा ओटीटी फ्लॅटफॉर्मवर मिळणार्या कामातूनच अभिनेते जोरदार पैसा मिळवत आहेत. काही कलाकारांना चित्रपटात काम मिळत नसले तरी ते ओटीटी फ्लॅटफॉर्मवर वेबसिरीजमध्ये मात्र दमदार भूमिका साकारताना दिसत आहेत. त्यामुळे सध्या सगळ्यांनाच वेबसिरीज आणि ओटीटी फ्लॅटफॉर्मचे वेड लागल्याचे चित्र दिसत आहे यावरूनच अभिनेता झीशान अय्युबने आपले मत व्यक्त केले आहे.
ओटीटी प्लॅटफॉर्मने सध्या काही कलाकारांना सुगीचे दिवस आणल्याचे चित्र दिसत आहे. चित्रपटांमध्ये फारशी भूमिका नसलेल्या कलाकारांसाठी यामुळे नवीन दरवाजे उघडले आहेत. हिंदी चित्रपट जगतात असे अनेक कलाकार आहेत ज्यांना चित्रपटात काम मिळत नव्हते, आणि काम मिळाले तरी त्यांच्या भूमिकेला फारसा वाव मिळत नव्हता . अभिनेता झीशान अय्युब सध्या ओटीटीच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर वेब सीरिजमध्ये व्यस्त आहे. तो लवकरच Zee5 च्या ‘ब्लडी ब्रदर्समध्ये’ दिसणार आहे.
याबद्दल झीशान म्हणतो की, “अनेक अभिनेत्यांना असे काम मिळाले आहे जे त्यांना चित्रपटांमध्ये मिळाले नाही, त्यांना पात्रांमध्ये प्रयोग करण्याची परवानगी दिली जाते आणि प्रतिभा प्रेक्षकांसमोर येते. झीशानने एका मुलाखतीत सांगितले की, “मला वाटते OTT च्या सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही बाजू आहेत. कलाकारांसाठी भरपूर संधी आहे परंतु कधीकधी मला असे वाटते की एक संधी आहे आणि तुम्ही निसटता, सर्वकाही नीट संपत नाही. तथापि यासाठी, योग्य कामाची निवड हुशारीने करणे देखील आवश्यक आहे.”
ऍमेझॉन प्राइम व्हिडिओच्या ‘तांडव’ वेबसीरिजमध्ये झीशानला खूप पसंती मिळाली होती. त्याने शिवशेखर नावाच्या तरुणाची भूमिका साकारली होती. तांडवचे दिग्दर्शन अली अब्बास जफर यांनी केले होते. ही मालिका प्रेक्षकांना आवडली पण त्यातील अनेक दृश्यांवरून बराच वाद झाला. एवढेच नाही तर त्यावर बहिष्कार टाकण्याची मागणीही करण्यात आली. ‘तांडव 2’ची काय तयारी आहे, या प्रश्नावर तो म्हणाला, नाही, आम्ही शूटिंग सुरू केलेले नाही. तो पुढे आहे, आशा आहे की लवकरच तो शोमध्ये काम सुरू करेल.” तांडव वेबसीरिजमध्ये झीशानसोबत सैफ अली खान, डिंपल कपाडिया, सुनील ग्रोवर, अनूप सानी आणि गोहर खान मुख्य भूमिकेत होते.