Tuesday, July 1, 2025
Home बॉलीवूड ‘न लग्न करता मुलं कशी काय दत्तक घेऊ शकता?’ सुश्मिता सेनने एका मुलीला दिला सल्ला

‘न लग्न करता मुलं कशी काय दत्तक घेऊ शकता?’ सुश्मिता सेनने एका मुलीला दिला सल्ला

हिंदी चित्रपट जगतात अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांच्या आगळ्या वेगळ्या जिवनशैलीसाठी प्रसिद्ध आहेत. यांपैकी अभिनेत्री सुश्मिता सेनच्या आयुष्याचे तिच्या चाहत्यांना नेहमीच कुतूहल वाटत असते. विश्वसुंदरीपासून सुरू झालेला तिचा अभिनयाचा प्रवास हिंदी चित्रपट जगतात चांगलाच गाजला. सुश्मिताच्या चित्रपटांपेक्षा तिच्या खासगी आयुष्याचीही नेहमीच चर्चा होत असते. विवाहित नसूनही तिने दोन मुलींना दत्तक घेतल्याने तिच्यावर जोरदार टिका झाली होती. आता याच मुद्यावर सुश्मिताने आपले मत मांडले आहे.

सुश्मिता सेनला हिंदी चित्रपट जगतातील यशस्वी अभिनेत्री म्हणून ओळखले जाते. आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने तिने चित्रपट जगतात आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. तिच्या सौंदर्याचे आणि अभिनयाचे असंख्य चाहते पाहायला मिळतात. सुश्मिताने विवाहित असूनही दोन मुलींंना दत्तक घेतले आहे. आपल्या मुलींसोबत अनेकदा ती आपले फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. लग्न झालेले नसूनही तिने या मुलींचे मातृत्व स्विकारल्यामुळे नेहमीच तीला अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागते. तिच्या या निर्णयावर आजही अनेकदा चर्चा पाहायला मिळत असते. यामुळेच तिला सिंगल मदरचा टॅगही लागला आहे. तिच्या या निर्णयावर तिच्यावर अनेकदा टिका केली जाते. यामुळेच तिने या मुद्द्यावर आपले मत मांडले आहे. तिच्या या पोस्टची सध्या चर्चा होत आहे.

सुश्मिताने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून याबद्दल आपले मत मांडले आहे. या पोस्टमध्ये तिने लग्न न करता मुलांना दत्तक कशी घेऊ शकते, असा प्रश्न उपस्थित करत तिच्या या भूमिकेचे स्पष्टिकरण दिले आहे. ती म्हणते की, “याबद्दल नेहमीच मला विचारले जाते, डिवचले जाते, मात्र मी हा निर्णय माझ्या मताने घेतला आहे,” असे स्पष्ट मत तिने व्यक्त केले आहे. तिच्या या भूमिकेचे आणि पोस्टचे सध्या सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी सुंदर प्रतिक्रिया दिल्या आहेत. यामध्ये एका युजरने “यासाठीच तुम्ही आम्हाला खूप आवडता,” असे म्हणत तिचे कौतुक केले आहे, तर आणखी एकाने “लोक बोलतच असतात त्यांच्याकडे लक्ष देऊ नका” असा सल्ला दिला आहे. सध्या तिच्या या पोस्टचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.

हे देखील वाचा