‘भाभी जी घर पर है’ या कॉमेडी कार्यक्रमाने बऱ्याच काळापासून लोकांचे केले आहे. या कार्यक्रमामधील सर्वच पात्रांनी प्रेक्षकांच्या मनावर आपली वेगळी छाप उमटवली आहे, कालांतराने अनेक प्रसिद्ध पात्रांनी या मालिकेचा निरोप घेतला असला तरी या नव्या चेहऱ्यांनीही यामध्ये लोकांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे. कार्यक्रमातील प्रत्येक व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडते मात्र लोकांना अंगूरी भाभी आणि तिवारी जी यांची रोमँटिक केमिस्ट्रीने नेहमीच वेड लावले आहे.
‘भाभी जी घर पर है’ ही मालिका टीव्ही क्षेत्रातील सर्वात विनोदी आणि लोकप्रिय मालिका म्हणून ओळखली जाते. गेली अनेक वर्षे ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत असून आजही या कार्यक्रमाची लोकप्रियता अबाधित आहे. मालिकेतील तिवारी आणि अंगूरी भाभीची जोडी तर सगळ्यात प्रसिद्ध आहे त्यांची ऑनस्क्रीन केमिस्टी प्रत्येकालाच मंत्रमुग्ध करते. आता या दोघांचा असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये दोघांची चांगलीच जुगलबंदी पाहायला मिळत आहे. अंगूरी भाबी आणि तिवारी यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ शुभांगी अत्रेने स्वतः इंस्टाग्रामवर शेअर केला आहे, ज्यामध्ये रोहिताश्व गौर म्हणजेच तिवारीजी स्वयंपाक करताना दिसत आहेत, तेव्हा शुभांगी अत्रे मागून अंगूरीच्या लूकमध्ये येते आणि गाणे गायला सुरुवात करते.
यानंतर पार्श्वभूमीत गाणे वाजू लागते. यावर तिवारीजींचे संतप्त भाव पाहण्यासारखे आहेत, व्हिडिओतील तिवारी आणि अंगूरी यांची रोमँटिक केमिस्ट्री पाहण्यासारखी आहे. दोघांची नेहमीच पडद्यावर दिसणारी जुगलबंदी पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ शेअर करत शुभांगीने “जूने ते सोने ऑफ स्क्रीन मस्ती” असे कॅप्शन लिहिले आहे. सध्या हा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल होत आहे.
- हेही वाचा-
- आपल्या आवाजाने सगळ्यांना वेड लावणाऱ्या अंकित तिवारीच्या करिअरला ‘आशिकी २’ चित्रपटाने दिले नवे वळण
- कोट्यवधी रुपयांची कमाई करणाऱ्या सोनाक्षीने काही लाखांसाठी इव्हेंट मॅनेजरला घातला गंडा? कोर्टाकडून वॉरंट जारी
- युक्रेनहून परतलेल्या उर्वशी रौतेलाने सांगितला किस्सा; घाबरत म्हणाली, ‘परिस्थिती खूपच…’










