या वर्षी मराठी टेलिव्हिजनवर अनेक नवीन मालिका आल्या. काही मालिकांनी अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकली तर काही मात्र अपयशी ठरल्या. परंतु मालिका कमी कालावधीत त्यांचा खास आणि मोठा चाहता वर्ग तयार केला. या वर्षी सोनी मराठीवर ‘अजूनही बरसात आहे’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. मालिकेत मुक्ता बर्वे आणि उमेश कामत हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. मालिकेचा कहाणी अत्यंत सुंदर होती त्यामुळे प्रेक्षकांनी देखील खूप चांगला प्रतिसाद दिला. अशातच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. मालिकेचा शेवटाची भाग टेलिकास्ट झाला आहे. त्यावेळी मुक्ता बर्वेने शेवटच्या दिवशी शूट केलेला एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
मुक्ताने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये मालिकेतील सगळे कलाकार दिसत आहेत. हा व्हिडिओ शेअर करून तिने एक खास आणि भावुक कॅप्शन दिले आहे.
तिने लिहिले आहे की, “शुटींगचा शेवटचा दिवस …, आमच्या पडद्यामागच्या सगळ्या टीमनी इतका सुंदर साजरा केला. सगळे मस्त नटून- थटून, झब्बे घालून आले होते. एखादा सण आहे असं वाटत होतं. आमची ही मंडळी पडद्यावर कधीच दिसत नाहीत, पण ही सगळीजणं आहेत म्हणूनच आम्ही तुम्हाला दिसू शकतो. iris production च्या सगळ्या टीमला खूप प्रेम आणि मनापासून thanks( आपल्या सगळ्या टीमची insta handles माहित नाहीयेत त्यामुळे सगळ्यांना tag करु शकले नाही.)आज सिरियलचा शेवटचा भाग टेलीकास्ट झाला. प्रेक्षक म्हणून तुम्ही सगळ्यांनी दिलेल्या प्रेमासाठी खूप खूप मनापासून आभार.” अशाप्रकारे तिने तिचा अनुभव व्यक्त केला आहे.
मालिकेत प्रेक्षकांना अनेक वळणं पाहायला मिळाली आहेत. मुक्ता आणि उमेशची केमेस्ट्री देखील प्रेक्षकांना खूप आवडली. सगळ्यांनी त्यांच्या जोडीला खूप प्रेम दिले. अशातच मालिका बंद झाल्याने चाहत्यांना वाईट वाटत आहे. या मालिकेच्या जागी आता ‘असे हे सुंदर आमचे घर’ ही नवीन मालिका येणार आहे.
हेही वाचा :