Sunday, April 14, 2024

मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांचा एसटीमधील जुना फोटो शेअर करून सांगितला अनुभव

आपल्या विनोदी स्वभावाने संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीला खळखळून हसवणारा अभिनेता भरत जाधव. त्याने मराठी चित्रपटसृष्टीत अनेक विनोदी चित्रपटात काम केले आहे. आजकाल तो जास्त चित्रपटात दिसत नाही. पण आजही त्याच्या अभिनयाची जादू प्रेक्षकांवर आहे. सोशल मीडियावर देखील तो अनेकवेळा पोस्ट शेअर करत असतो. अशातच त्याची एक पोस्ट समोर आली आहे.

भरतने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. फोटो तसा जुनाच आहे. या फोटोत एसटीमध्ये अनेक लोक दिसत आहेत. फोटोत पाहता काही लोक चिंतेत दिसत आहेत. काहीजण खिडकीच्या बाजूला बसून निसर्गाचा अनुभव घेत आहेत. तर काहीजण झोपलेले दिसत आहे.

हा फोटो शेअर करून त्याने एक खास कॅप्शन देखील दिले आहे. त्याने लिहिले आहे की, “हा फोटो खूप कमाल आहे. महाराष्ट्राची लोकधाराच्या वेळेसचा. साधारणतः 30 वर्षांपूर्वीचा. या बसमध्ये तीन जिवलग मित्र तीन वेगवेगळ्या विंडो सीट पाशी बसलेले आहेत. तिघेही मराठी नाटक आणि लोककलेच्या प्रेमाने झपाटलेले. आयुष्यात महत्वाच्या वळणांवर अशी योग्य माणसं भेटत गेली आणि प्रामाणिकपणे कष्ट घेतले तर जगणं किती सुंदर हाऊ शकतं हे तिघांनीही अनुभवलंय..!” अशाप्रकारे त्याने या फोटोचा अनुभव शेअर केला आहे.

त्याने त्याच्या चाहत्यांचा शेअर केलेला हा अनुभव अनेक कलाकारांना खूप आवडला आहे. तसेच या पोस्टवर अनेक कलाकार सातत्याने कमेंट करत आहेत. तसेच त्याच्या कामाचे कौतुक करत आहेत.

भरत जाधवने अनेक चित्रपटात काम केले आहे. त्याने ‘जत्रा’, ‘खबरदार’, ‘पछाडलेला’, ‘माझा नवरा तुझी बायको’, ‘भुताचा हनिमून’, ‘नाना मामा’, ‘होऊन जाऊ दे’, ‘अगंबाई अरेच्चा’, ‘मुक्काम पोस्ट लंडन’, ‘क्षणभर विश्रांती’ या चित्रपटात काम केले आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अभिनेता भरत जाधवच्या सोशल मीडिया अकाऊंटच्या बाबतीत घडली ‘ही’ सही गोष्ट
इंडिका गाडीतून भरत जाधव गेला होता ‘सही रे सही’च्या पहिल्या शोला, मनोरंजक होता ‘त्या’ शोचा किस्सा

हे देखील वाचा