साल २०१६ मध्ये जम्मू-काश्मीरमधील उरी दहशतवादी हल्ल्यानंतर, भारत आणि पाकिस्तानमधील संबंधांमध्ये तणाव आणखी वाढले आहेत. या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातली होती. बॉलिवूडनेही हा निर्णय मान्य करत, पाकिस्तानी कलाकारांसोबत काम न करण्यास सांगितले. दोन्ही देशांमधील संबंध अद्यापही सुधारलेले नाहीत. अशात बॉलिवूड अभिनेता संजय दत्तचा (Sanjay Dutt) असा एक फोटो व्हायरल झाला आहे, ज्यावर सातत्याने प्रश्न उपस्थित होत आहेत.
संजय दत्तचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांच्यासोबत दिसत आहे. हे अभिनेत्याच्या चाहत्यांना अजिबात आवडलं नाही आणि इतर युजर्सही या फोटोबद्दल वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी बोलत आहेत. (sanjay dutt met former pakistani president pervez musharraf in dubai photo goes viral on internet)
Former President #PervaizMusharraf and Indian actor #SanjayDutt met accidentally yesterday in #Dubai. pic.twitter.com/nyh7kygZUO
— Hani Qureshi (@HaniQureshi5) March 16, 2022
संजय दत्तने दुबईत परवेझ मुशर्रफ यांची भेट घेतल्याचे सांगण्यात येत आहे. हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, अनेकजण संजय दत्तवर नाराजही दिसत आहेत. २०१६ मध्ये पठाणकोट-उरी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध ताणले गेले होते.
पहिल्यांदा जानेवारीमध्ये पाकिस्तानच्या दहशतवादी संघटनेच्या जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी, पंजाबमधील पठाणकोट एअर फोर्स स्टेशनवर हल्ला केला आणि त्यानंतर सप्टेंबरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी उरी येथील लष्कराच्या छावणीवर हल्ला करून १९ जवानांना ठार केले. तेव्हा दोन देशातील संबंध पूर्णपणे बिघडले. झालं असं की, पाकिस्तानी कलाकारांना बॉलिवूडमध्येही बंदी घालण्यात आली. द्वेषाच्या या भिंती ओलांडून संजय दत्तची माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांच्याशी झालेली भेट चाहत्यांना अजिबात आवडली नाही.
What the hell has a #Bollywood actor got to do with #MASTERMINDofKARGIL …#SanjayDutt loves #DRUGS #DARU #GUNS and #dawoodibrahim
Sanjay dutt with Mushraf in dubai.
Thats why I say that liberation of #Bollywood #LeLI #KHANdan is a must and #TheKashmirFiles is the start. pic.twitter.com/RF7IDC0rKq
— Raman Malik???????? (@ramanmalik) March 17, 2022
लोक फक्त संजय दत्तवरच राग काढत आहेत असे नाही, तर त्यांची नाराजी आता बॉलिवूडवरही उमटू लागली आहे. एका युजरने लिहिले आहे की, “यात काही शंका नाही. हा सर्व संजय दत्तचा इतिहास आहे. तुम्हाला आश्चर्य का वाटत आहे? बॉलिवूडला कोणतीही लाज वाटत नाही. मला वाटते ही आपली चूक आहे.” तर आणखी एकाने म्हटले आहे, “जनरल मुशर्रफ संजय दत्तसोबत फिरत आहेत, काय चालले आहे?”
एकाने विचारले आहे की, “कारगिलच्या मास्टरमाइंडसोबत बॉलिवूड अभिनेता काय करत आहे?” अशातच आता लोकांना संजय दत्तचे प्रकरणही आठवत आहे, ज्यात मुंबईतील १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोटानंतर पकडलेल्या अबू सालेमने संजय दत्तला शस्त्रे दिल्याचे कबूल केले होते. संजय दत्त बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी दोषी ठरला होता आणि टाडा कोर्टाने त्याला पाच वर्षांची शिक्षाही सुनावली होती.
आता या फोटोवर संजय दत्तची काय प्रतिक्रिया येते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-










