Friday, July 26, 2024

जेलमध्ये कागदी पिशव्या बनवून संजय दत्तने कमावले होते ५०० रुपये, बाहेर आल्यानंतर काय केलं त्या पैशांचं?

अभिनेता संजय दत्त (Sanjay Dutt) दीर्घकाळापासून चित्रपटसृष्टीत काम करत आहे. त्याने आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. या अभिनेत्याने प्रत्येक अडचणीवर मात केली आहे. १९८० च्या दशकात तो अंमली पदार्थांच्या व्यसनामुळे चर्चेत होता आणि त्यानंतर १९९३ मध्ये मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी त्याच्यावर खटला दाखल करण्यात आला होता. यामुळे अभिनेत्याला तुरुंगात जावे लागले. यापूर्वी एका मुलाखतीत संजयने तुरुंगात काम करताना ५०० रुपये कमावल्याचे सांगितले होते.

साल १९९३ मध्ये बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगल्याप्रकरणी टाडा न्यायालयाने संजयला २००७ मध्ये तुरुंगात टाकण्याचे आदेश दिले होते. २०१३ मध्ये, सर्वोच्च न्यायालयाने निर्णय कायम ठेवल्यानंतर, अभिनेत्याने आत्मसमर्पण केले. २०१३ ते २०१६ या काळात तो पुण्याच्या येरवडा मध्यवर्ती कारागृहात होता. (sanjay dutt revealed he made 500 rupees making paper bags in jail)

तुरुंगात कमावले ५०० रुपये!
साल २०१८ मध्ये एंटरटेनमेंट की रात सीझन २’च्या स्पेशल एपिसोडमध्ये संजय पाहुणा म्हणून दिसला होता. यावेळी अभिनेत्याने सांगितले की, “तुरुंगात जुन्या वृत्तपत्रांपासून कागदी पिशव्या बनवल्या जात होत्या आणि त्यासाठी पैसेही मिळत असायचे. आम्ही तिथल्या वर्तमानपत्रांपासून कागदी पिशव्या बनवायचो. मला एक गोणीसाठी २० पैसे मिळायचे.” शोची होस्ट टिस्का चोप्राने तुरुंगात असताना किती पैसे कमावले असा प्रश्न विचारला होता. याला उत्तर देताना अभिनेते म्हणाले की, “मी तिथे असताना साडेतीन ते चार वर्षांत सुमारे ४०० ते ५०० रुपये कमावले होते आणि तुरुंगातून आल्यानंतर ते पैसे मी माझी पत्नी मान्यताला दिले. माझ्यासाठी ते ५०० रुपये म्हणजे ५ कोटी रुपये होते.”

‘या’ चित्रपटात दिसणार अभिनेता
अभिनेता म्हणाला की, “तुरुंगात तुम्ही सकारात्मक मानसिकतेने जगले पाहिजे, कारण तुम्ही दिवसभर बसून विचार करू शकत नाही की माझ्यासोबत असे का झाले आहे. सर्व काही विसरून पुढे जावे लागते. तुरुंगात सकारात्मक दृष्टिकोन ठेवा आणि तेथे काहीतरी शिका.” सध्या अभिनेता त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या वर्षी त्याचे चार चित्रपट येत आहेत. तो ‘पृथ्वीराज’, ‘शमशेरा’, ‘द गुड महाराजा’ आणि कन्नड चित्रपट ‘केजीएफ चॅप्टर २’ मध्ये दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही नक्की वाचा-

हे देखील वाचा