Thursday, November 13, 2025
Home अन्य क्रिकेटर ग्लेन मॅक्सवेलने भारतीय वंशाच्या गर्लफ्रेंडशी केले लग्न, जाणून घ्या कोण आहे विनी रमण?

क्रिकेटर ग्लेन मॅक्सवेलने भारतीय वंशाच्या गर्लफ्रेंडशी केले लग्न, जाणून घ्या कोण आहे विनी रमण?

ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज अष्टपैलू क्रिकेटर ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) सध्या त्याच्या लग्नामुळे चर्चेत आहे. शुक्रवारी (२५ मार्च २०२२) त्याची गर्लफ्रेंड विनी रमणसोबत (Vini Raman) त्याने लग्न केले. विनी मूळची भारतीय आहे. ग्लेन मॅक्सवेल इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) कडून खेळला. गेल्या पाच वर्षांपासून तो विनिला डेट करत होता. दोघांनी आधी ख्रिश्चन धर्मानुसार लग्न केले, नंतर आता पारंपारिक तमिळ रितीरिवाजानुसार लग्न केले.

विनी रमण या मूळ भारतीय आहेत. ती तामिळ हिंदू कुटुंबातील आहे. विनी रमन ही मूळची भारतीय आहे, पण तिचा जन्म ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे झाला. येथून तिने वैद्यकीय शास्त्राचे शिक्षण पूर्ण केले आणि ती फार्मासिस्ट झाली. विनी रमन यांनी व्हिक्टोरिया येथील मेंटन गर्ल्स सेकंडरी कॉलेजमधून आपले शिक्षण पूर्ण केले आहे. विनी रमन सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिने ग्लेन मॅक्सवेलसोबतचे अनेक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. ग्लेन मॅक्सवेल आणि विनी रमन यांची मार्च २०२० मध्ये एंगेजमेंट झाली. कोरोनामुळे त्यांचे लग्न पुढे ढकलण्यात आले होते आणि आता दोघांचे लग्न झाले आहे.

विनी रमन तिच्या कुटुंबाच्या खूप जवळ आहे आणि अनेकदा तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर तिच्या भाचीसोबतचे गोंडस फोटो शेअर करत असते. विनी रमनने आपल्या एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये सांगितले होते की, मॅक्सवेल आणि तिची २०१३ मध्ये मेलबर्नमधील एका कार्यक्रमात भेट झाली होती.

मॅक्सवेलने त्याच्याशी संभाषण सुरू केल्याचे विनीने सांगितले होते. काही वर्षे डेटिंग केल्यानंतर दोघांनीही आपले नाते अधिकृत केले. ती अनेक प्रसंगी मॅक्सवेलसोबत दिसली. तमिळमध्ये छापलेली मॅक्सवेल आणि विनीच्या लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली. विनीला पोहणे, प्रवास आणि क्रिकेटची आवड आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा –

हे देखील वाचा