सेम-सेक्स रिलेशनशिपवाल्या ‘या’ अभिनेत्रीला ऑस्कर, ठरली पहिलीच LGBTQ+, अनेक मुलींशी जोडलंय नाव

जगभरात प्रतिष्ठेचा समजला जाणारा मानाचा ऑस्कर पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. या पुरस्कार सोहळ्याने अनेक दिग्गज कलाकारांना शानदार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मनोरंजन क्षेत्रातील जगातील सर्वात मानाचा पुरस्कार म्हणून या सोहळ्याकडे पाहिले जाते. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हा सोहळा तीन वर्ष पार पडला नव्हता आता इतक्या वर्षांनी हा सोहळा पार पडला आणि अनेक आश्चर्यकारक घटनांनी चर्तेतही आला.

विल स्मिथने सुत्रसंचालकाच्या श्रीमुखात भडकावलेल्या घटनेची जगभरात चर्चा झाली. मात्र यापेक्षा ही जास्त चर्चा झाली ती एरियाना डेबॉस हिला (ariana debose)  मिळालेल्या ऑस्कर पुरस्काराची. कारण एरीयाना ही ऑस्कर पुरस्कार मिळवणारी पहिली कृष्णवर्णीय अभिनेत्री बनली आहे. त्याबरोबर एरियाना तिच्या समलैंगिक संबंधांची जाहीरपणे कबुली करणारीही पहिलीच अभिनेत्री बनली आहे.  जाणून घेऊ या तिच्या या प्रवासाबद्दल.

याबाबत संपुर्ण माहिती अशी की, अमेरिकेच्या लॉस एंजेलिसमध्ये ९४ वा ऑस्कर पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. यामध्ये अभिनेत्री एरियाना डेबासला वेस्ट साइड स्टोरी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ठ सहायक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. याआधी एरियानाने तिचे समलैगिंक संबंध जाहिरपणे सांगितल्यामुळे सर्वत्र चर्चेत आली होती. तसेच ती ऑस्कर पुरस्कार मिळवणारी दुसरीच एल्फ्रो लॅटिनही अभिनेत्री बनली आहे.

View this post on Instagram

A post shared by Ariana DeBose (@arianadebose)

त्यामुळे हा पुरस्कार सोहळा तिच्यासाठी चांगलाच आनंद देणारा ठरला आहे. हा पुरस्कार मिळाल्यानंतरचा आनंद एरियानाने अत्यंत भावूक शब्दात व्यक्त केल्या आहेत. ज्यामध्ये ती म्हणते की, “एका कृष्णवर्णीय मुलीने आपल्या कलेच्या माध्यमातून आयुष्यात शक्ती मिळवलेली आहे. जर कोणी तुमच्या व्यक्तिमत्वावर प्रश्नचिन्ह उभे केले तर तुम्ही तुमच्याकडे लक्ष द्या, आणि मला सगळ्यांना हे सांगायचे आहे की, सगळ्यांसाठी एक क्षेत्र आहे, आणि स्वप्ने खरी होतात.”

याआधी एरियाना तिच्या समलैंगिक संंबंधांबद्दल अनेक मुलाखतीत बोलताना दिसली आहे. याचा खुलासा तिने २०१५ मध्ये केला होता. मात्र तिने कधीही आपल्या जोडीदाराचे नाव समोर येऊ दिले नाही. मात्र तरीही तिच्या अनेक मैत्रिणींची चर्चा यासाठी होत असते. या यादीत जिल जॉन्सनचे नाव प्रामुख्याने घेतले जात होते. दोघीही अनेकदा सोबत फिरताना दिसल्या होत्या. मात्र त्यानंतर त्यांच्यात ब्रेकअप झाल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या. सध्या एरियानाचे नाव इंटेरिअर डिजायनर शू मैक्कोसोबत जोडले गेले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

भल्या भल्या अभिनेत्रींना मागे सारत सोनाली फोगटच्या ‘या’ डान्सने चुकवला चाहत्यांच्या काळजाचा ठोका, पाहाच

राडा, रडारड आणि बरंच काही.! प्लॅन इतका परफेक्ट होता की थेट मांडवात जाऊन ‘तिचं’ लग्न मोडलं, पण नंतर…

हजारो चाहते, १०० कोटीचा खर्च अन् थेट टिव्हिवर प्रक्षेपण, असा होता ज्युनिअर एनटीआरच्या लग्नाचा थाट

Latest Post