Tuesday, August 5, 2025
Home बॉलीवूड जॉन अब्राहमने रेस्टॉरंटमध्ये तब्बल 64 चपाती खाल्ल्यानंतर आश्चर्यचकित झालेल्या वेटरची होती ‘अशी’ प्रतिक्रिया

जॉन अब्राहमने रेस्टॉरंटमध्ये तब्बल 64 चपाती खाल्ल्यानंतर आश्चर्यचकित झालेल्या वेटरची होती ‘अशी’ प्रतिक्रिया

बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक असलेल्या जॉन अब्राहमच्या (John Abraham) फिटनेसने कोणाचेही होश उडतील. लाखो चाहत्यांसाठी प्रेरणास्थान बनलेल्या जॉन अब्राहमसारखा फिटनेस प्रत्येकाला मिळावा अशी इच्छा आहे. जॉन वर्कआऊटसोबतच त्याच्या डाएटची खूप काळजी घेतो. पण जॉन नेहमीच असा नव्हता. एक काळ असा होता की जॉन खूप जेवण करायचा.

एकेकाळी जेवणाचा शौकीन असलेल्या जॉनने 64 रोट्या खाल्ल्या

कपिल शर्मा शोमध्ये याचा खुलासा झाला आहे. जिथे अभिनेत्याने सांगितले की, त्याने एकदा एका रेस्टॉरंटमध्ये 64 रोट्या खाल्ल्या होत्या. ‘द कपिल शर्मा शो’मध्ये त्याच्या आगामी ‘अटॅक’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आलेल्या जॉन अब्राहमने एक मजेदार किस्सा सांगितला. हे ऐकून कपिल शर्माला हसू आवरत नाही. होस्ट कपिलने अभिनेत्याला विचारले की, “तू एकदा रेस्टॉरंटमध्ये 64 रोट्या खाल्ल्या होत्या ही अफवा खरी आहे का?” उत्तरात जॉन म्हणाला की, “हो हे खरे आहे.

कपिल शर्माला आवरता आले नाही हसू

यानंतर तो सांगतो की, “माझ्या 64 रोट्या खाल्ल्यानंतर वेटर माझ्याकडे आला आणि म्हणाला अजून भात आहे.” जॉन अब्राहमचे हे बोलणे ऐकल्यानंतर सेटवर हशा पिकला. जॉनच्या आगमनाने ‘द कपिल शर्मा’ शोमध्ये खूप धमाल उडाली. जॉन अब्राहमने एकदा 64 रोट्या खाल्ल्या असतील, पण आज त्याची जीवनशैली पूर्णपणे वेगळी आहे. जॉनच्या स्नायू आणि टोन्ड शरीरावर मुली मरतात. जॉनच्या फिटनेसवर चाहते फिदा आहेत.

अभिनेत्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर त्याचा आगामी चित्रपट ‘अटॅक’ आहे. यामध्ये जॉन अब्राहमसोबत रकुल प्रीत सिंग आणि जॅकलीन फर्नांडिस दिसणार आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर चर्चेत आहे. हा चित्रपट 1 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. चाहत्यांना जॉन अब्राहम पुन्हा एकदा ऍक्शन करताना दिसणार आहे. जॉन ‘अटॅक’नंतर शाहरुख खान अभिनित ‘पठाण’ या चित्रपटात दिसणार आहे. संपूर्ण देश या चित्रपटाची वाट पाहत आहे. (actor john abraham once ate 64 rotis at restaurant waiter got shocked)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
खासदार नवनीत राणा यांचे ‘पठाण’ चित्रपटावर मोठे वक्तव्य म्हणाल्या, ‘चित्रपटामध्ये भावना दु:खवणारे दृष्य असेल तर…’

देवोलीना भट्टाचार्जी आपल्या पतीला मिठी मारून रडली ढसाढसा; म्हणाली, ‘दिव्याने शोधले असते…’

हे देखील वाचा