Tuesday, January 31, 2023

देवोलीना भट्टाचार्जी आपल्या पतीला मिठी मारून रडली ढसाढसा; म्हणाली, ‘दिव्याने शोधले असते…’

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी नुकतीच लग्न बधंनात अडकली आहे. तिने शहनवाज शेख याच्यासाेबत गुपचूप लग्न केले आहे. देवोलीनाच्या हळदीचे आणि लग्नाच्या विधींचे फोटोही सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. अनेक फाेटाेंमध्ये ती आपल्या पतीसोबत मस्ती करताना दिसली. अशातच तिचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती आपल्या पतीला मिठी मारून रडताना दिसत आहे.  

याआधी देवोलीना (devoleena) विशाल सिंहसोबत लग्न करणार असल्याची चर्चा होती. मात्र, तिने जिम ट्रेनर शाहनवाज शेखसोबत लग्न करून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. चाहत्यांना तिच्याबद्दल सर्व काही जाणून घ्यायचे आहे. चाहते तिच्या प्रत्येक अपडेटची आतुरतेने वाट पाहत आहे. अशातच देवोलीनाचा हा भावनिक व्हिडिओ सर्वांचे मन जिंकत आहे, ज्यामध्ये ती आपल्या नवऱ्याला मिठी मारून रडताना दिसत आहे.

लग्नानंतर देवोलीना तिच्या लग्नाशी संबंधित प्रत्येक अपडेट तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. आता एका व्हिडिओमध्ये तिने आपल्या मनातले भाव दाखवले आहे. या व्हिडिओमध्ये देवोलीनाने तिच्या स्वप्नातील राजकुमारासाठी अनेक गोष्टी लिहिल्या आहेत, ज्या जाणून घेतल्यानंतर प्रत्येकजण भावूक होऊ शकतो. देवोलीनाने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “आणि हो.. आता मी अभिमानाने सांगू शकते की, तू आता माझा आहेस, मी दिव्याने शोधले असते तरी तुझ्यासारखा कोणीही सापडला नसता. तू माझ्या प्रत्येक दुःखाला आणि प्रार्थनेला उत्तर आहेस, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, शोनू.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Devoleena Bhattacharjee (@devoleena)

देवोलीनाचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री खूप भावूक झालेली दिसत आहे. ही पोस्ट शेअर करत तिने चाहत्यांचे आभार मानले आहे आणि लिहिले की, “तुम्हा सर्वांचे खूप प्रेम, आम्हाला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे, आम्हाला तुमच्या प्रार्थनांमध्ये नेहमी ठेवा.” पुढे देवोलीनाने लिहिले की, ‘मिस्ट्रियस मॅन फेमस शोनू आणि तुझी मेहुणी.”

माध्यमातील वृत्तानुसार, देवोलीनाचे कुटुंब या नात्यासाठी फारसे आनंदी नव्हते. पण हळूहळू त्यांच्या प्रेमासमोर सर्वजण सहमत झाले आणि दोघांनीही प्रेमविवाह केला. देवोलीनाने टीव्ही सीरियल ‘साथ निभाना साथिया’मध्ये गोपी बहूची भूमिका साकारून घरोघरी ओळख मिळवली होती. (tv actre`s`s devoleena bhattacharjee seen crying madly hugging her husband shahnawaz sheikh see emotional video here)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
भगव्या रंगात न्हाउन निघालीये ही अभिनेत्री, पाहा जबरदस्त फोटो

‘बेशरम रंग’च नाही, तर ‘या’ गाण्यांमुळेही झाला हाेता माेठा वाद, एकदा पाहाच यादी

हे देखील वाचा