Tuesday, January 20, 2026
Home बॉलीवूड ‘या’ प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्याची बायको आहे मराठी आणि हिंदीमधील नावाजलेली अभिनेत्री

‘या’ प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्याची बायको आहे मराठी आणि हिंदीमधील नावाजलेली अभिनेत्री

सुपरस्टार मुरली शर्माचे  (murali Sharma) नाव घेतले की प्रत्येकालाच त्याचा गाजलेला ‘गोलमाल’ चित्रपट आठवायला लागतो. आपल्या दमदार अभिनयाने त्याने हिंदी चित्रपट जगतात प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे.  हिंदी आणि तामिळ चित्रपट जगतात आपल्या अभिनयाचा डंका वाजवणाऱ्या मुरली शर्माच्या नावावर अनेक गाजलेले चित्रपटांची नोंद आहेत. मात्र खूप कमी लोकांना माहित आहे की या प्रसिद्ध अभिनेत्याची बायकोही हिंदी आणि मराठी चित्रपट जगतातील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

अभिनेता मुरली शर्मा हा हिंदी आणि तामिळ चित्रपट जगतातील एक प्रसिद्ध अभिनेता म्हणून ओळखला जातो. मुरली शर्माने आतापर्यंत अनेक चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारल्या आहेत. विविध प्रकारच्या आव्हानात्मक भूमिका साकारण्याकडे त्याचा कल असतो. त्यामुळेच एक प्रतिभावान अभिनेता अशीच त्याची विशेष ओळख आहे. यशाच्या उंच शिखरावर असूनही तो माध्यमांपासून नेहमीच दुर राहणे पसंत करतो त्यामूळेच त्यांच्या वैवाहिक जिवनाबद्दल अनेकांना माहिती नाही. या प्रसिद्ध अभिनेत्याची पत्नी अश्विनी कळसेकरही मराठी आणि हिंदी चित्रपट जगतातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

अश्विनी कळसेकरने(Ashwini kalsekar) आपल्या अभिनयाला मराठी चित्रपट सृष्टीतुन सुरूवात केली आहे. करिअरच्या सुरूवातीला तिने अनेक मराठी मालिकांमध्ये काम केले होते. यानंतर तिला शांती नावाच्या हिंदी मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. या मालिकेने तिला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. त्यानंतर आलेल्या सीआयडी मालिकेतही अश्विनीने भूमिका साकारली होती. तिची ही भूमिकाही प्रेक्षकांमध्ये प्रचंड गाजली. अश्विनीने मुसाफिर, कुंकू, गोलमाल या चित्रपटात काम केले आहे.

दरम्यान या दोघांनी २००९ मध्ये लग्नगाठ बांधली. मात्र या लग्नाच्या आधीही अश्विनीचे मनोज पांडेसोबत लग्न झाले होते. मात्र त्यांचे हे नाते फार काळ टिकू शकले नाही त्यामुळे त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मुरली आणि अश्विनी यांच्यात मैत्री झाली आणि याच मैत्रीचे नाते प्रेमात होऊन दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. सध्या दोघेही आपल्या वैवाहिक आयुष्यात व्यस्त आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा –

मुंबईतील ट्रॅफिक टाळण्यासाठी ‘या’ स्टार अभिनेत्याने केला लोकल ट्रेनमधून प्रवास, व्हिडिओ झाला व्हायरल 

‘मी आता थकलोय’, प्रसिद्ध गायक लकी अली होणार निवृत्त, संगीतविश्वाला करणार बाय-बाय?

दाक्षिणात्य सुपरस्टार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नितीन रेड्डीचे ‘हे’ हिंदी डब सिनेमे आहेत यूटुबवर लोकप्रिय

हे देखील वाचा