Thursday, March 28, 2024

दाक्षिणात्य सुपरस्टार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नितीन रेड्डीचे ‘हे’ हिंदी डब सिनेमे आहेत यूटुबवर लोकप्रिय

दाक्षिणात्य सुपरस्टार नितीन रेड्डी आज (३० मार्च) त्याचा ३० वा वाढदिवस साजरा करत आहे. ‘जयम’ या सिनेमातून त्याने आपल्या अभिनयाची सुरुवात केली. आज नितीन साऊथ इंडस्ट्रीमधील मोठे नाव बनला आहे. त्याला लाखो चाहते असून, सोशल मीडियावरही त्याला असंख्य फॉलोवर्स आहे. आपल्या पहिल्याच सिनेमातून त्याने त्याची वेगळी छाप प्रेक्षकांवर आणि समीक्षकांवर पाडली आणि पदार्पणाचा फिल्मफेयरचा पुरस्कार पटकावला. नितीन फक्त त्याच्या ऍक्शनसाठीच नाही तर गुडलुक्ससाठी देखील ओळखला जातो. एक अभिनेता असण्यासोबतच एक निर्माता देखील आहे. नितीन साऊथमध्ये एकापेक्षा एक ऍक्शन सिनेमे दिले आहेत. नितीनची दुसरी ओळख म्हणजे तो सुधाकर रेड्डी यांचा मुलगा आहे. त्याचे हिट झालेले आणि हिंदीमध्ये डब केलेले काही सिनेमे यूटुबवर तुम्ही पाहू शकतात.

(जयम) हिंदी डब- ‘फिर होगी प्यार की जीत’
अभिनेता नितीन रेड्डीने त्याच्या करिअरची सुरुवात ‘जयम’ सिनेमातून केली. साऊथमध्ये हा सिनेमा जबरदस्त हिट झाला. या चित्रपटाला हिंदीमध्ये ‘फिर होगी प्यार की जीत’ नावाने प्रदर्शित केले गेले. हा सिनेमा आज यूटुबवर उपलब्ध आहे.

https://www.youtube.com/watch?v=b_oIhi08ISU

(अन्जनेयम) हिंदी डब- ‘माय बॉस बजरंगबली’
‘अन्जनेयम’ या साऊथ सिनेमाला हिंदीमध्ये ‘माय बॉस बजरंगबली’ सिनेमात नितीन रेड्डी हनुमानाचा मोठा भक्त दाखवण्यात आला होता. या सिनेमात अर्जुन सरजा देखील महत्वाच्या भूमिकेत होते. त्यांनी हनुमानाची भूमिका साकारली होती. यासोबतच प्रकाश राज आणि दिग्गज अभिनेत्री सौम्या कृष्णन देखील होते. हा एक ऍक्शन सिनेमा आहे.

(साय) हिंदी डब- ‘आर पारः द जजमेंट डे’
नितीन रेड्डीचा हा सिनेमा प्रसिद्ध दिग्दर्शक एस एस राजामौली यांनी दिग्दर्शित केला होता. या सिनेमामुळे नितीन सिनेसृष्टीमधे त्याची पक्की जागा मिळवू शकला. हा एक ऍक्शन थ्रिलर सिनेमा आहे.

(टक्कारी) हिंदी डब- ‘मेरी लड़ाई’
२००७ साली आलेल्या ‘टक्कारी’ सिनेमाचे दिग्दर्शन अम्मा राजशेखर यांनी केले असून, या सिनेमात नितीनने अशा मुलाची भूमिका साकारली जो एका मिलिनियर मुलीचे मन जिंकून घेतो. रोमान्स आणि ऍक्शन यांचे उत्तम मिश्रण या सिनेमात दिसून येते.

(अतादिस्त) हिंदी डब- डेयरिंग गुंडाराज
२००८ साली आलेल्या या सिनेमाने नीतींसोबत काजल अग्रवाल मुख्य भूमिकेत होती. ए एस रवि कुमार दिग्दर्शित हा एक रोमँटिक कॉमेडी सिनेमा आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा