Wednesday, October 15, 2025
Home बॉलीवूड ‘कपिल शर्मा ‘सोबत पुन्हा एकदा प्रेक्षकांना हसवणार ‘सुनील ग्रोवर’! सलमान खानच्या प्रयत्नांना मिळाले यश?

‘कपिल शर्मा ‘सोबत पुन्हा एकदा प्रेक्षकांना हसवणार ‘सुनील ग्रोवर’! सलमान खानच्या प्रयत्नांना मिळाले यश?

कॉमेडीचा बादशाह ‘कपिल शर्मा’ हा प्रेक्षकांना नेहमीच हसवत असतो. प्रेक्षकांना हसवण्याची एकही संधी तो सोडत नाही. अनेक वर्षापासून तो प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे. इतक्या वर्षात आपण या ‘शो’ला नवीन रंगारुपात पाहिले आहे. परंतु इतके वर्ष होऊनही कपिल शर्माच्या अंदाजात काडीमात्र देखील फरक पडला नाहीये. या ‘शो’ला घेऊन अनेक वादविवाद झाले, परंतु आपल्या‌ मेहनतीच्या जोरावर त्यांनी या ‘शो’ला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. आज त्यामुळेच हा ‘शो’ यशाच्या पायऱ्या चढत आहे. जेव्हा कपिल या शो’च्या स्टेजवर त्याच्या सहकाऱ्यांसोबत येतो तेव्हा मात्र ते सगळे स्टेजला आग लावून टाकतात. कीकू शरदा, कृष्णा अभिषेक, सुमोना चटर्जी आणि चंदन हे सगळे कलाकार कपिलला वेळोवेळी साथ देत असतात, परंतु अजुन असा एक कलाकार आहे ज्याची कमतरता नेहमीच प्रेक्षकांना जाणवते. तो कलाकार म्हणजे ‘सुनील ग्रोवर’.

सगळ्या प्रेक्षकांना ही गोष्ट माहीत असेल की , काही वादानंतर सुनील ग्रोवरने या ‘शो’मध्ये येण्यास नकार दिला होता. त्यानंतर भलेही तो हा शो सोडून निघून गेला. पण आजही सगळे प्रेक्षक त्यांनी निभवलेली ‘गुत्ती’ आणि ‘डॉक्टर मशहूर गुलाटी’ ही पात्र विसरू नाही शकली. सगळे प्रेक्षक ‘सुनील’ला या शोमध्ये परत आणा अशी मागणी करत आहेत.

शो मेकर्सदेखील सुनीलला या ‘शो’मध्ये परत आणण्यासाठी खूप प्रयत्न करत आहेत आणि अनेक वर्षानंतर सुनील परत एकदा सगळ्या प्रेक्षकांना हसवताना दिसणार आहेत. सलमान खान बऱ्याच दिवसांपासून सुनील आणि कपिलमधील भांडण सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. सलमानला कपिल शर्मा शोमध्ये सुनील खूप आवडत होता. तसेच त्या दोघांची बॉन्डिंगदेखील खूप चांगली आहे. यामुळे ‘शो’चे प्रोड्युसर असण्याच्या नात्याने त्यांना असे वाटते की, सुनीलने पुन्हा एकदा या ‘शो’मध्ये यावे. द कपिल शर्मो या शोचे मेकर्स देखील सुनीलला परत आणण्याचा प्रयत्न करत आहेत. पण आता सुनीलचा निर्णय काय असणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

काही वर्षांपूर्वी सुनील आणि कपिल यांची एका फ्लाईटमध्ये एक भांडण झाल होतं. त्यानंतरच सुनीलने ‘कपिल शर्मा शो’ सोडून देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु त्यानंतर कपिलने सुनीलची माफी देखील मागतली आणि शोमध्ये परत येण्याची विनंती देखील केली होती, परंतु सुनील काही या शोमध्ये परत आला नाही. या घटनेनंतर ते दोघे अनेक वेळा एकमेकांना भेटले. एकमेकांना शुभेच्छा देखील दिल्या. परंतु काम करण्यासाठी मात्र एकत्र नाही आले.  त्यांच्यातील हे वाद मिटले तर सुनील लवकरच कपिल शर्मा शोमध्ये प्रेक्षकांच्या भेटायला येणार आहे.

 

हे देखील वाचा