ताहिरा कश्यप प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेता आयुष्मान खुराणाची बायको. ताहिरा जरी आयुषची बायको असली तरी ती एक उत्तम लेखिका आणि नाट्य दिग्दर्शिका सुद्धा आहे. ताहिरा नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. अनेकदा ती तिची मतं, फोटो, अपडेट सर्वांसोबत शेयर करताना दिसत असते.
नुकतीच ताहिराने पोस्ट केलेल्या एका फोटोमुळे आणि त्या फोटोसोबत लिहिलेल्या एका संदेशामुळे बातम्यांमध्ये आली आहे. केंडल जेनर या अभिनेत्रींचे फोटोशूट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून, ताहिराने याच संदर्भात तिची एक पोस्ट शेयर केली आहे.
ताहिराने केंडल जेनरच्या फोटोवर एक संदेश लिहीत मजबूत शरीराचे फायदे आणि महत्व सांगितले आहे. ताहिराने तिचा एका सेल्फी पोस्ट करत लिहिले की, “`सध्या केंडल आणि तिचे लिंगरी मधील फोटोज इंटरनेटवर व्हायरल होत आहे. इतर महिलांप्रमाणे माझाही हाच प्रश्न आहे की, असे कसे दिसू जाऊ शकते. तिचे बेली बटन खूप आकर्षक आणि सुंदर दिसत आहे, जसे की एखाद्या बाळाला काळी तीट लावली आहे. मला खरंच माहित नाही की इतक्या छोट्या कपड्याने एखाद्याची वैयक्तिक गोष्टी कशी काय झाकली जाऊ शकते?”
पुढे ताहिराने केंडल जेनरसिबत स्वतःची तुलना करत लिहिले, “ती वेळ माझ्यासाठी सत्य जाणून घेण्याची होती. जे काही मी पहिले, त्याबाबत मी काय विचार करते? एका ६९ किलो वजनाच्या स्त्रीने तिच्या स्ट्रॉन्ग बॉडीमुळे शरीरावर अनेक जखमा असूनही लिफ्टमध्ये अडकलेल्या तिच्या वडिलांना, मुलीला आणि बहिणीला वाचवले. मी माझी पूर्ण ताकत लावत लिफ्टचा दरवाजा उघडला आणि आत अडकलेल्या माझ्या लोकांना वाचवले. माझ्या ह्याच वजनामुळे मला मी हिरो असल्याचे फील झाले. तेव्हा मी याच वजनाचे आभार मानले, ज्याला मी कमी करण्यासाठी प्रयत्न करत होती.”
ताहिराची ही पोस्ट तुफान व्हायरल होत आहे. फॅन्स, नेटकऱ्यांसोबतच अनेक कलाकार देखील तिच्या या पोस्ट वर कमेंट्स करत आहेत.










