Wednesday, October 23, 2024
Home बॉलीवूड प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक गणेश आचार्यवर २०२० सालातील प्रकरणामुळे लागला लैंगिक शोषणाचा आरोप

प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक गणेश आचार्यवर २०२० सालातील प्रकरणामुळे लागला लैंगिक शोषणाचा आरोप

बॉलिवूडमधील प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक असलेल्या गणेश आचार्य विरोधात मुंबई पोलिसांनी लैंगिक शोषण, पाठलाग करण्याचा आरोप लावत एक आरोपपत्र तयार केले आहे. याबद्दल एका पोलीस ऑफिसरने माहिती देताना सांगितले की, मुंबईच्या ओशिवरा इथे या प्रकरणावर मेट्रोपोलिटन मजिस्ट्रेट इथे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

माहितीनुसार नृत्यदिग्दर्शक गणेश आचार्य आणि त्याचे सहायक असणाऱ्या व्यक्तीवर कलम ३५४ ए (लैंगिक शोषण) कलम ३५४ सी ३५४ डी (पाठलाग), ५०९ (अपमान) ५०६ (धमकी) आणि ३४ (अपराध करण्याची इच्छा) या अंतर्गत आरोप लावण्यात आले आहे. मात्र अजूनही यावर गणेश आचार्यकडून कोणतेही मत आले नाही.

२०२० साली एका महिला कोरिओग्राफरने तक्रार नोंदवताना सांगितले की, ती गणेश आचार्यच्या ऑफिसमध्ये काम करण्यासाठी जात होती. तेव्हा गणेश तिच्यावर चुकीच्या कमेंट्स करताना अश्लील व्हिडिओ बनवण्यासाठी सांगायचा. जेव्हा त्या महिलेने गणेश यांची ऑफर नाकारली तेव्हा त्याने तिला त्रास द्यायला सुरुवात केली. त्यानंतर सहा महिन्यांनी भारतीय फिल्म आणि टेलिव्हिजन कोरियोग्राफर एसोसिएशनने त्यांची सदस्यता रद्द केली.

याशिवाय त्या महिलेने सांगितले की, जेव्हा एका मीटिंगमध्ये तिने गणेश आचार्यचा विरोध केला तेव्हा तिच्यासोबत मारपीट देखील करण्यात आली. तिच्या महिला सहाय्यकांनी तिच्यासोबत मारपीट करताना तिला शिवीगाळ देखील केली. यानंतरच तिने पोलिसांमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. मात्र पोलिसांनी तक्रार नोंदवण्यास नकार दिला. त्यानंतर एका वकिलाच्या मदतीने तिने केस नोंदवली.

गणेश आचार्य बॉलिवूडमधील आघाडीचा नृत्यदिग्दर्शक असून, त्याने अनेक मोठमोठ्या कलाकारानं त्याच्या तालावर नाचवले आहे. शरीराने स्थूल असूनही गणेशने त्याच्या कलेच्या जोरावर बॉलिवूडमध्ये मोठे नाव कमावले. नृत्यदिग्दर्शक असण्यासोबतच गणेशने रेमो डिसुझाच्या एबीसीडी सिनेमातून अभिनीत देखील पदार्पण केले आहे. आजही बॉलिवूडमध्ये अनेक मोठमोठी गाणी गणेशाचं कोरिओग्राफ करताना दिसतो. बॉलिवूडसोबतच गणेशने इतरही अनेक प्रादेशिक सिनेसृष्टीमधे काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा –

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा