Tuesday, April 16, 2024

विल स्मिथच्या ‘ऑस्कर’ प्रकरणावर समीरा रेड्डीने दिल्ली प्रतिक्रिया, ‘या’ महाभयंकर आजाराचाही केला उल्लेख

तीन वर्षानंतर झालेल्या ऑस्कर पुरस्कार सोहळा विल स्मिथमुळे चांगलाच गाजला. या पुरस्कार सोहळ्यात विल स्मिथला सर्वोत्कृष्ठ अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता. मात्र विल स्मिथ (Will Smith) आणि क्रिस रॉकमध्ये (Cris Rock) झालेल्या वादामुळेच तो जास्त चर्चेत राहिला. या कार्यक्रमाचा निवेदक म्हणून काम पाहणाऱ्या क्रिस रॉकने बोलताना स्मिथच्या पत्नीची थट्टा केली होती. ज्यावरुन राग अनावर झाल्याने स्मिथने क्रिसच्या कानाखाली लगावली होती. यावर जगभरातून अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या होत्या. या घटनेवर आता अभिनेत्री समीरा रेड्डीने (Sameera reddy) अशा प्रकारच्या आजारातुन मीही गेली असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. 

याबाबत संपुर्ण माहिती अशी की, विल स्मिथच्या या चर्चित आलेल्या प्रकरणानंतर अभिनेत्री समीरा रेड्डीने Alopecia रोगाचा सामना केल्याची माहिती दिली आहे. याबद्दल तिची एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये ती म्हणते की अलिकडेच झालेल्या ऑस्करच्या वादानंतर मला लॉस बेटलबद्दल सांगावेसे वाटले. आपल्या सर्वांच्याच आयुष्यात अनेक अडचणी असतात. ज्यांचा आपण सामना करत असतो. पण आपल्याला याबद्दल जागरुक राहणे गरजेचे असते.

या आजाराबद्दल बोलताना ती म्हणते की, “जेव्हा तुम्हाला एलोपेसिया एरीटा आजार होतो तेव्हा तुमच्या केसांवर त्याचा विपरित परिणाम होतो. केस खूप गळायला लागतात. असा प्रकार माझ्यासोबतही झाला होता. दोनच महिन्यात माझे केस विरळ झाले होते. या आजाराशी लढणे खूपच कठीण असते. यामुळे व्यक्तीला इजा होत नाही पण मानसिकरित्या ती व्यक्ती खूपच दुखावते. यावेळी माझ्या डोक्यात corticosteroids इंजेक्शन देण्यात आले ज्यामुळेच माझे केस पून्हा आले. पण मला डॉक्टरांनी हे देखील सांगितले होते की, हा आजार पुन्हा कधीही होऊ शकतो. हा आजार व्हायला काही विशेष कारण लागत नाही. त्यामुळे याबद्दल सर्वानी जागरुक राहिले पाहिजे.”

दरम्यान समीरा रेड्डी ही हिंदी चित्रपट जगतातील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. ‘मुसाफिर’, ‘दे दणा दण’ सारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटात तिने काम केले आहे. सध्या ती फारशी चित्रपटात दिसत नसली तरी सोशल मीडियावर मात्र नेहमीच चर्चेत असते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा –

हे देखील वाचा