Wednesday, September 23, 2026
Home बॉलीवूड गॉगल घालून गायिका नेहा कक्करचा ‘काला चष्मा’ गाण्यावर धमाकेदार डान्स, पती रोहनही दिसला व्हिडीओत

गॉगल घालून गायिका नेहा कक्करचा ‘काला चष्मा’ गाण्यावर धमाकेदार डान्स, पती रोहनही दिसला व्हिडीओत

बॉलिवूडमधील नावाजलेली गायिका ‘नेहा कक्कर’ आपल्या स्टाईलमुळे आणि अंदाजने खूपच लोकप्रिय झाली आहे. तिचे फोटोज् आणि व्हिडीओ नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. नेहा कक्कर ही प्रेक्षकांमध्ये खूपच लोकप्रिय आहे. तिच्या गाण्यासोबतच तिची अक्टिंग देखील प्रेक्षकांना खूपच भावते. तिच्या निखळ आणि खळखळत्या हसण्याने ती लाखो मनावर अधिराज्य गाजवत असते.

नेहा कक्कर हीचा नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये नेहा ‘कतरिना कैफ’ हीच्या ‘काला चश्मा’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. या गाण्यात डान्स करताना तिने काळ्या रंगाचा गॉगल देखील घातला आहे. तिच्यासोबत तिचा नवरा रोहणप्रित सिंग आणि भाऊ टोनी कक्कर हे देखील या व्हिडिओमध्ये डान्स करत आहेत. या व्हिडीओला नेहाने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. या व्हिडीओला आतापर्यंत 19 हजार पेक्षाही जास्त वेळा बघितले गेले आहे.

या व्हिडिओमध्ये नेहा एका वेगळ्याच अंदाजात प्रेक्षकांसमोर आली आहे. तिने सिल्व्हर कलरचा ड्रेस घातला आहे, तसेच डोळ्यांवर काळ्या रंगाचा चश्मा लावला आहे. तिच्यासोबत रोहनप्रित आणि टोनी देखील तिला साथ देताना दिसत आहे. खूपच एन्जॉय करत त्या तिघांनी हा व्हिडिओ तयार केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच धुमाकूळ घालत आहे. या व्यतिरिक्त नेहाचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये ती एका लहान मुलाला भरवताना दिसत आहे.

नेहा कक्करच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, नेहा सध्या सोनी टीव्ही वरील इंडियन आयडल हा रिऍलिटी शो जज करत आहे. काही दिवसांपूर्वी नेहाला यू ट्यूब चॅनल साठी ‘डायमंड बटण’ देखील दिले आहे. याला प्राप्त करणारी ती पहिली भारतीय गायिका ठरली आहे. नेहा कक्करने मागच्या वर्षी झालेल्या रायझिंग स्टार या रियॅलिटी शो फेम रोहनप्रित सिंग यांच्या सोबत लग्न केले आहे.

हे देखील वाचा