Monday, July 1, 2024

जितेंद्र यांना पहिल्या चित्रपटासाठी मिळाले होते फक्त ‘इतके’ रुपये; तर 6 महिने मिळाला नव्हता पगार

अभिनेते जितेंद्र कपूर हे बॉलिवूडमधील त्या कलाकरांपैकी एक आहेत, ज्यांनी बऱ्याच काळापासून स्टारडम पाहिला आहे. त्यांचे अनेक चित्रपट सुपरहिट ठरले, पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, जितेंद्र यांच्या चित्रपट कारकिर्दीचा सुरुवातीचा काळ बराच संघर्षमय होता. जितेंद्र सुरुवातीच्या काळात मुंबईतील एका चाळीत राहत होते. जितेंद्र महाविद्यालयात शिकत होते, त्यावेळी त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर घर चालवणे कठीण झाले, म्हणून जितेंद्र यांना स्वतःहून काम सुरू करायचे होते. शुक्रवारी (7 एप्रिल) रोजी ते त्यांचा वाढदिवस साजरा करत आहेत, यानिमित्त जाणून घेऊया त्यांच्याबाबत काही खास माहिती

जितेंद्र यांना प्रथम ज्युनिअर कलाकार म्हणून काम मिळाले. त्यांना हे काम चित्रपट निर्माते शांताराम यांनी दिले होते. त्यांना सांगण्यात आले की, ज्या दिवशी कोणताही ज्युनिअर कलाकार येणार नाही, त्यांना त्यादिवशी कामावर घेतले जाईल आणि त्यांना दर महिन्याला 105 रुपये दिले जातील.

पहिल्या ब्रेकच्या बदल्यात मिळाले कमी पैसे
मिळालेल्या माहितीनुसार, हळूहळू जितेंद्र शांताराम यांना आवडायला लागले होते. ‘गीत गाया पत्थरों ने’ यासाठी शांताराम यांनी जितेंद्र यांना साईन केले होते. या चित्रपटात शांताराम यांनी रवी कपूरचे नाव जितेंद्र असे ठेवले. जितेंद्र यांना चित्रपट मिळाला, पण त्यांना ब्रेक देण्यात आला. त्यामुळे पैसे कमी झाले. त्यांना दर महिन्याला 100 रुपयांवर साईन केले. परंतु पहिल्या 6 महिन्यांसाठी त्यांना पैसे दिले गेले नाहीत.

दीर्घ संघर्षानंतर मिळाली ओळख
जितेंद्र यांनी आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीला खूप मेहनत घेतली होती. त्यानंतर 1967 मध्ये त्यांना ‘फर्ज’ चित्रपटातून एक नवीन ओळख मिळाली. या चित्रपटातील ‘मस्त बहारों का मैं आशिक’ हे गाणे प्रेक्षकांना प्रचंड आवडले होते. अशाप्रकारे जितेंद्र ‘जंपिंग जॅक’ बनले होते. यानंतर त्यांनी ‘हमजोली’ आणि ‘कारवां’ यांसारखे चित्रपट केले आणि ते सुपरस्टार बनले.

बालाजी टेलिफिल्म्स आणि बालाजी मोशन पिक्चर्सचे चेअरमन
त्याचबरोबर जितेंद्र आता बालाजी टेलिफिल्म्स आणि बालाजी मोशन पिक्चर्सचे चेअरमन आहेत. त्यांची मुलगी एकता कपूरने चित्रपट आणि टेलिव्हिजन क्षेत्रात वेगळे स्थान प्राप्त केले आहे. तसेच मुलगा तुषार कपूरही अभिनयक्षेत्रात सक्रिय आहे.(actor jeetendra signed first movie for 100 rs although he did not get money for 6 months 2)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘नॅशनल क्रश’ने केला वयाचा 27वा टप्पा पार, वाढदिवसाच्या खास शुभेच्छांसाठी चाहत्यांचे मानले आभार

‘मूड थोडा गंभीर’ अमिताभ बच्चन यांनी आरामानंतर पुन्हा सुरु केली शूटिंग, फॅन्स म्हणाले…

हे देखील वाचा