Tuesday, April 16, 2024

आयुष्यातील २० वर्षे ‘जम्पिंग जॅक’ जितेंद्र यांनी घालवली होती चाळीत, ५ वर्षांच्या संघर्षानंतर मिळाली होती चित्रपटात संधी

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र हिंदी सिनेमात आपल्या वेगळ्या शैली आणि अभिनयासाठी ओळखला जातात. बॉलिवूडमधील बर्‍याच चित्रपटांमध्ये त्यांनी वेगवेगळ्या स्टाईलमध्ये नृत्य करून, प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. जितेंद्र यांचा जन्म 7एप्रिल, 1942 रोजी पंजाबच्या अमृतसर येथे झाला. जितेंद्र यांचे खरे नाव रवी कपूर आहे. ते बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता तुषार कपूर आणि निर्माता-दिग्दर्शक एकता कपूर यांचे वडील आहेत.

जितेंद्र यांच्या जन्मानंतर त्यांचे कुटुंब मुंबईच्या गिरगावमधील चाळीत स्थायिक झाले होते. या चाळीचे नाव होते ‘शाम सद्म चाळ.’ या चाळीत त्यांनी आयुष्याची जवळपास 20वर्षे व्यतीत केली. 1959मध्ये रिलीझ झालेल्या नवरंग या चित्रपटाने जितेंद्र यांनी बॉलिवूडमध्ये आपल्या कारकिर्दीची सुरूवात केली होती. या चित्रपटात त्यांची खूप छोटी भूमिका होती. यानंतर जीतेंद्र यांना चित्रपटसृष्टीत बरीच वर्षे संघर्ष करावा लागला.

जवळपास पाच वर्षे जितेंद्र यांनी इंडस्ट्रीमध्ये अभिनेता म्हणून काम मिळवण्यासाठी धडपड केली. त्यानंतर त्यांना १९६४ साली ‘गीत गाया पत्थरों ने’ या चित्रपटात मुख्य अभिनेता होण्याची संधी मिळाली. यानंतर, हळूहळू त्यांनी  बॉलिवूडमध्ये स्वत: चे खास आणि वेगळे स्थान निर्माण केले. त्यांनी  250हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्याबरोबर निर्माता आणि दिग्दर्शक म्हणूनही त्यांनी काम केले, आणि भरपूर प्रसिद्धी मिळवली.

त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक शानदार चित्रपट केले आहेत, ज्यात ‘परिवार’, ‘जीने की राह’, ‘वारिस’, ‘खिलौना’, ‘हमजोली’, ‘बिदाई’, ‘धरमवीर’, ‘जानी दुश्मन’ आणि ‘हिम्मतवाला’मध्ये काम केले आणि चित्रपटाच्या पडद्यावर आपली छाप सोडली. त्यांनी वेगवेगळ्या स्टाईलमध्ये नृत्य करून प्रेक्षकांची मने जिंकली, म्हणून बॉलिवूडने त्यांना ‘जम्पिंग जॅक’ असे नाव दिले. चित्रपटांशिवाय जितेंद्र आपल्या वैयक्तिक आयुष्यासाठीही चर्चेत होते. ही गोष्ट खूप कमी चाहत्यांना माहित असेल की, ते बॉलिवूडची ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनीशी लग्न करणार होते.

एका वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, ही गोष्ट 1974 सालची आहे. ‘वारिस’ आणि दीप चाल’ या चित्रपटाच्या दरम्यान जितेंद्र आणि हेमा मालिनी यांच्यात चांगली मैत्री होती, आणि हळूहळू ती मैत्री प्रेमात बदलली. जीतेंद्र आणि हेमा मालिनी यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला, आणि तेव्हा ते चेन्नईमध्ये होते. त्यावेळी जितेंद्र यांचे शोभा (सध्याची पत्नी) बरोबरही संबंध होते. हे कळताच धर्मेंद्र  शोभाला चेन्नईला घेऊन गेले होते. तिकडे शोभाने गोंधळ घातल्याने जितेंद्र व हेमा मालिनीचे लग्न होऊ शकले नव्हते. (happy birthday jeetendra know unknown facts abouhim)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
धर्मेंद्र यांनी घातलेला ‘तो’ राडा, ज्यामुळे मोडले होते जितेंद्र आणि हेमा मालिनीचे लग्न, वाचा खास लव्हस्टोरी
हनुमान जयंतीनिमित्ताने ‘आदिपुरुष’सिनेमातील हनुमानाचा लूक रिव्हिल, ‘हा’ मराठमोळा अभिनेता साकारणार भूमिका

हे देखील वाचा