Friday, December 13, 2024
[aioseo_breadcrumbs]

चिन्मय मांडलेकरच्या पत्नीची नवऱ्यासाठी खास पोस्ट; म्हणाली, ‘बाबांना बहुतेक तेव्हाच समजलं असावं …’

सध्या मराठी चित्रपट जगतात ऐतिहासिक विषयांवर चित्रपट बनवण्याची मालिकाच सुरू झाली आहे. दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) यांनी याआधी ‘फत्तेशिकस्त’, ‘फर्जंद’, ‘पावनखिंड’ अशा दमदार चित्रपटांची निर्मिती केली आहे. त्यांच्या या चित्रपटांना जगभरातील शिवप्रेमींनी अभूतपुर्व प्रतिसाद दिलेला पाहायला मिळाला किंबहुना अजूनही मिळत आहे. आता त्यांच्या ‘शेर शिवराज‘ चित्रपटाची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. त्यांच्या या चित्रपटाचा अंगावर काटे आणणारा ट्रेलर नुकताच रिलीज झाला असून चित्रपटात छत्रपती शिवरायांच्याव भूमिकेतील चिन्मय मांडलेकरने सर्वांचीच मने जिंकली आहेत. या दमदार अभिनयासाठी चिन्मय मांडलेकरचे (Chinmay Mandlekar) सर्वत्र कौतुक होत आहे. आता त्याच्या पत्नीनेही एक खास पोस्ट करत त्याचे कौतुक केले आहे. 

याबाबत संपूर्ण माहिती अशी की अभिनेता चिन्मय मांडलेकरने साकारलेल्या छत्रपती शिवरायांच्या भूमिका प्रचंड गाजत आहेत. दिग्पाल लांजेकरच्या फर्जंद, फत्तेशिकस्त, पावनखिंड या सगळ्या चित्रपटात  शिवरायांची भूमिका चिन्मयने अत्यंत कुशलपणे साकारली आहे. दमदार अभिनय आणि भारदस्त व्यक्तिमत्वाने त्याने शिवधनुष्य लिलया पेलले आहे. या शिवरायांच्या भूमिकेत चिन्मयने आणलेला जिवंतपणा सध्या सर्वत्र कौतुकाचा विषय़ ठरला आहे. अनेकजणांनी या भूमिकेबद्दल चिन्मय मांडलेकरचे तोंडभरुन कौतुक केले आहे. चिन्मयच्या पत्नीनेही त्याच्या कौतुकासाठी एक खास फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये अभिनेता चिन्मय मांडलेकर त्याच्या वडिलांच्या मांडीवर शिवरायांच्या वेशभूषेत बसलेला दिसत आहे.

पत्नी नेहा जोशीने ही खास पोस्ट शेअर करत “बाबांना बहुतेक तेव्हाच समजलं असावं, आज जिथे असतील तिथून आई – बाबांना तुझा फक्तं आणि फक्तं अभिमानंच वाटत असेल. त्यांच्या आशीर्वादाशिवाय काहीही शक्य नाही,” अशा खास शब्दात पतीचे तोंडभरुन कौतुक केले आहे. नेहा जोशीची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. फोटोमधील बालशिवरायांच्या वेशभूषेतील चिन्मय खूपच गोंडस दिसत आहे. दरम्यान अभिनेता चिन्मय मांडलेकरने महाराजांच्या भूमिकेत आणलेला जिवंतपणा आणि चित्रपटाची दमदार कथा यांमुळे हा चित्रपट सिनेमागृहात जोरदार धमाका करणार असल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वी चित्रपटाच्या संपूर्ण टीमने प्रतापगडावर जात भवानी मातेचे दर्शमम घेतले होते. त्यावेळी शिवरायांच्या घोषनांनी परिसर दणाणून सोडला होता. २२ एप्रिलला चित्रपट प्रदर्शित होणार असून आता चित्रपटाची जगभरातील शिवप्रेमींना उत्सुकता लागली आहे. त्यामुळे पून्हा एकदा सिनेमागृहे शिवरायांच्या घोषणांंनी गरजणार आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा –

आलियासोबत लग्न करणाऱ्या रणबीरने ‘या’ अभिनेत्रींना केले आहे डेट, एक आहे साऊथमधील सुपरस्टार अभिनेत्री

बिग बॉस ओटीटी फेम गायक मिलिंद गाबाने केला साखरपुडा, व्हिडिओ आणि फोटो झाले व्हायरल

‘जर्सी’ सिनेमाच्या निमित्ताने पहिल्यांदाच कपिल शर्मा शोमध्ये दिसणार शाहिद आणि पंकज कपूर या बापलेकाची जोडी

हे देखील वाचा