×

“भगवा थेट आदिलशाहीच्या छाताडात नेऊन गाडायचा…”, ‘शेर शिवराज’ चित्रपटाचा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर

छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तृत्व आणि शौर्य संपूर्ण जगापुढे आणि येणाऱ्या पिढयांना माहित व्हावे या हेतूने मराठीमधील अतिशय हुशार, सर्जनशील आणि प्रभावी दिग्दर्शक असणाऱ्या दिग्पाल लांजेकर यांनी एक विडा उचलला आहे. तो विडा म्हणजे महाराजांच्या आयुष्यातील आठ महत्वाच्या घटना चित्रपटांच्या रूपाने प्रेक्षकांसमोर आणायच्या आहेत. या आठ घटना ज्यांनी संपूर्ण जनतेला त्यांच्या हिंदवी स्वराज्याचे नुसते स्वप्नच नाही दाखवले तर ते पूर्ण करण्याच्या हेतूने पावले देखील टाकली गेली. दिग्पाल लांजेकर यांच्या ‘श्री शिवराज अष्टका’मधील चौथे पुष्प असणाऱ्या ‘शेर शिवराज’ सिनेमाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या ट्रेलरमध्ये महाराजांच्या कारकिर्दीमधील महत्वाच्या अशा ‘अफजल खानचा वध’ दाखवण्यात आला आहे.

ट्रेलरच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांचा वध करण्यासाठी अफजल खान दख्खनमध्ये दाखल होतो. त्याचा जनतेवरील अत्याचार आणि क्रूरता ट्रेलरच्या सुरुवातीला पाहायला मिळते. या अफजल खानचा कायमचाच बंदोबस्त करण्यासाठी महाराज काय नवीन शक्कल लढवतात आणि अतिशय बलाढ्य आणि धिप्पाड असणाऱ्या या क्रूर अफजल खानचा वध कसा करतात याची कथा या सिनेमातून दिसणार आहे. हा ट्रेलर बघताना अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाही, इतका दमदार ट्रेलर आहे.

शिवचरित्रातील अतिशय महत्वाची घटना म्हणून अफजल खानच्या वाढकडे पाहिले जाते. प्रतापगडावर महाराजांनी अफजलखानासारख्या बलवान शत्रूला प्रभूतच नाही ते तर त्याचा कोथळाच बाहेर काढला होता. अतिशय विचाराने महाराजांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी मिळून या संपूर्ण घटनेला सत्यात उतरवले होते. या सिनेमात पुन्हा एकदा चिन्मय मांडलेकर महाराजांच्या भूमिकेत दिसणार असून त्यांच्यासोबत मुकेश रिषी, मृणाल कुलकर्णी, अजय पुरकर, समीर धर्माधिकारी दिसणार आहे. विशेष म्हणजे या सिनेमात वर्ष उसगांवकर देखील नकारात्मक भूमिका साकारताना दिसणार आहे.

दिग्पाल लांजेकर यांच्या अष्टकामधील ‘फर्जंद’ हा पहिला चित्रपट ठरला सुपरहिट होता. त्यानंतर ‘फत्तेशिकस्त’ आणि ‘पावनखिंड’ हे चित्रपट सुपरहिट ठरले होते. यानंतर आता शेर शिवराज हा चौथा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या २२ एप्रिल २०२२ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

Latest Post