Wednesday, April 30, 2025
Home नक्की वाचा लग्न करतायेत आलिया-रणबीर, पण दोघांचं ‘पहिलं लव्ह’ दुसरंच कुणी होतं, बघा कुणासाठी झुरावं लागलंय

लग्न करतायेत आलिया-रणबीर, पण दोघांचं ‘पहिलं लव्ह’ दुसरंच कुणी होतं, बघा कुणासाठी झुरावं लागलंय

रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांचे लग्न बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत असलेले लग्न ठरू शकते. दोन्ही स्टार्सची जबरदस्त फॅन फॉलोविंग आहे. त्यांच्या लव्ह लाईफचीही एकेकाळी खूप चर्चा झाली आहे. मात्र, आलिया ही रणबीरची पहिली पसंती नाही. वयाच्या अवघ्या ११व्या वर्षी ज्या रणबीरवर आलियाचे क्रश होते, तो आतापर्यंत ६ मुलींसोबत रिलेशनशिपमध्ये राहिला आहे. २०१९ मधील एका मुलाखतीदरम्यान रणबीरच्या भूतकाळाबद्दल विचारले असता, आलियाने सांगितले होते, “मी देखील काही कमी नाही.” खरं तर, आलियानेही रणबीरपूर्वी दुसऱ्या कोणालातरी डेट केले आहे.

यांच्याशी जुळलं रणबीरचं नाव

अवंतिका मलिक (Avantika Mallik)
३८ वर्षीय रणबीर त्याच्या अभिनय कौशल्यामुळे आणि आकर्षणामुळे चॉकलेट बॉय म्हणून प्रसिद्ध आहे. त्याचे पहिले नाते किशोरवयात अवंतिका मलिकसोबत असल्याचे सांगितले जाते. त्यांचे नाते फार काळ टिकले नाही आणि अवंतिकाने ‘जाने तू या जाने ना’ फेम इमरान खानशी (Imraan Khan) लग्न केले.

नंदिता मेहतानी (Nandita Mehtani)
फॅशन डिझायनर आणि उद्योगपती संजय कपूरची पहिली पत्नी नंदिता मेहतानी हिची आणि रणबीरची भेट ‘बचना ए हसीनो’ या चित्रपटाच्या सेटवर झाली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. नंदिता रणबीरपेक्षा १० वर्षांनी मोठी होती आणि कदाचित हीच गोष्ट त्यांच्या ब्रेकअपचे कारण बनली. काही वेळातच दोघे वेगळे झाले.

सोनम कपूर (Sonam Kapoor)
संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांच्या ‘ब्लॅक’ चित्रपटाच्या सेटवर रणबीर आणि सोनमची भेट झाली. दोघांनी ‘सावरिया’ चित्रपटातून एकत्र पदार्पण केले आणि यादरम्यान दोघे जवळही आले. ‘सावरिया’ हा चित्रपट फ्लॉप ठरला, पण सोनम आणि रणबीरची केमिस्ट्री खूप हिट ठरली. पण हे नाते फार काळ टिकले नाही आणि दोघेही वेगळे झाले.

दीपिका पदुकोण (Deepika Padukone)
रणबीर आणि दीपिकाच्या नात्याची सर्वाधिक चर्चा झाली आहे. २००७ मध्ये ‘बचना-ए-हसीनो’च्या सेटवर दोघांची भेट झाली होती. प्रेक्षकांना रणबीर आणि दीपिकाची जोडी आवडली, पण हे नातेही फारसे टिकले नाही. रणबीरने कॅटरिनासाठी दीपिकाची फसवणूक केल्याचे बोलले जाते.

कॅटरिना कैफ (Katrina Kaif)
रणबीरचे कॅटरिनासोबतचे नाते फार काळ टिकले. दोघांनी एकमेकांना तब्बल ६ वर्षे डेट केले. ‘अजब प्रेम की गजब कहानी’च्या सेटवर दोघांची भेट झाली होती. हा चित्रपट केवळ हिट झाला नाही, तर कॅट आणि रणबीरची जोडीही प्रेक्षकांना प्रचंड आवडली. जवळपास चार वर्षे लिव्ह-इनमध्ये राहिल्याने, हे दोघे लग्न करतील असे समजले जात होते. पण हे नातेही टिकू शकले नाही. आता कॅटरिनाने विकी कौशलसोबत (Vicky Kaushal) लग्नगाठ बांधली आहे.

माहिरा खान (Mahira Khan)
रणबीर पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानला डेट करत असल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या. दोघांचा एकत्र स्मोकिंग करतानाचा फोटोही प्रचंड व्हायरल झाला होता. ग्लोबल प्राइज टीचर्स सेरेमनीमध्ये दोघेही एकत्र दिसले होते, तेव्हा त्यांच्या नात्याच्या अफवांनी चांगलाच वेग घेतला होता.

आलिया भट्टचे अफेअर्स

अली दादरकर (Ali Dadarkar)
अभिनयाला सुरुवात करण्यापूर्वी आलियाचे नाव अली दादरकरसोबत जोडले गेले होते. आलिया अलीसोबत डिनर डेटवर जायची. आलियाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर त्यांचे अलीसोबतचे नाते संपुष्टात आले.

सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra)
आलिया आणि सिद्धार्थने ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या दोघांनी कधीही मीडियासमोर त्यांच्या नात्याची कबुली दिली नाही. पण काही वर्षे डेट केल्यानंतर त्यांचे ब्रेकअप झाल्याचे बोलले जात आहे.

कविन मित्तल (Kaween Mittal)
हाईक मेसेंजर ऍपचे संस्थापक कविन मित्तल यांच्यासोबत आलिया रिलेशनशिपमध्ये असल्याचे समोर आले होते. कविनने इम्पीरियल कॉलेज, लंडन येथे शिक्षण घेतले. मात्र या नात्याची कधीही पुष्टी होऊ शकली नाही.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा