आलिया नव्हे, तर रणबीर कपूरने आपल्या फोनमध्ये ठेवलाय ‘या’ व्यक्तीचा वॉलपेपर, पाहून तुम्हालाही बसेल धक्का 

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor)आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) सोमवारी (२२ जानेवारी) सकाळी विमानतळावर एकत्र दिसले. दोघेही सुट्टीसाठी बाहेर जात होते. यादरम्यान या दोघांचेही फोटो पॅपराझींच्या कॅमेऱ्यात कैद झाले. मात्र या दोघांचे फोटोच कॅमेऱ्यात कैद झाले नाहीत. तर अशा काही गोष्टीही कॅमेऱ्यात आल्या, ज्याला पाहून चाहते रणबीरचे जोरदार कौतुक करत आहेत. खरं तर, फोटोमध्ये रणबीरच्या फोनचा वॉलपेपर दिसत आहे. या वॉलपेपरमध्ये अभिनेत्याने वडील ऋषी कपूर (Rishi Kapoor) यांचा फोटो लावला आहे. रणबीरचा वॉलपेपर पाहून ऋषी कपूर यांचे चाहते खूप भावूक झाले. हा तोच फोटो आहे जो ऋषी कपूर यांनी २०१८ मध्ये ट्विटरवर शेअर केला होता. हा फोटो पाहिल्यानंतर सर्वजण रणबीरचे कौतुक करत आहेत. चाहते म्हणतात की, रणबीर अजून देखील त्याच्या वडिलांच्या खूप जवळ आहे.

‘शर्माजी नमकीन’ मध्ये दिसणार आहे अभिनेते
ऋषी कपूर लवकरच ‘शर्माजी नमकीन’ या चित्रपटात दिसणार आहेत. हा त्यांचा शेवटचा चित्रपट आहे. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान कर्करोगाने त्यांचे निधन झाले. यानंतर या चित्रपटातील काही सीन परेश रावल यांनी शूट केली आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शक हितेश भाटिया यांनी नुकतेच सांगितले होते की, हा चित्रपट पूर्ण करण्यासाठी रणबीर कपूरला सर्वप्रथम प्रोस्थेटिकद्वारे तयार केले जात होते, परंतु काही घडू शकले नाही. यानंतर परेश रावल यांनी या चित्रपटासाठी होकार दिला. त्यानंतर चित्रपटाचे उर्वरित चित्रीकरण झाले.

या चित्रपटात दिसणार आहेत ‘हे’ कलाकार
‘शर्माजी नमकीन’मध्ये ऋषी कपूर आणि परेश रावल यांच्याशिवाय जुही चावला, सुहेल नायर, तारुक रायना, सतीश कौशिक, शीबा चढ्ढा आणि ईशा तलवार दिसणार आहेत. ऋषी कपूर यांच्या या चित्रपटाची प्रेक्षक बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत आहेत. रणबीरही वडिलांच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होण्यापूर्वी त्याचा एक व्हिडिओही समोर आला होता. या व्हिडिओमध्ये त्याने हा चित्रपट स्वतःसाठी खूप खास असल्याचे सांगितले आहे.

‘ब्रह्मास्त्र’मध्ये दिसणार आहे अभिनेता
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर रणबीर कपूर लवकरच ’ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्या विरुद्ध आलिया भट्ट आहे. ‘ये जवानी है दिवानी’ फेम अयान मुखर्जीने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा- 

Latest Post