रणवीर सिंग (Ranveer Singh) केवळ त्याच्या उत्कृष्ट अभिनयासाठीच नाही, तर त्याच्या ड्रेसिंग सेन्ससाठीही ओळखला जातो. प्रत्येक वेळी तो त्याच्या अतरंगी ड्रेसिंग सेन्ससाठी चर्चा रंगवतो, मग तो त्याचा ड्रेस असो किंवा ऍक्सेसरीज. रणवीर अनेकदा त्याच्या विचित्र स्टाइलमुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनतो. नुकताच तो विमानतळावरून बाहेर पडताना स्पॉट झाला. यावेळी पुन्हा त्याच्या निराळ्या फॅशन सेन्सने अनेकांचे लक्ष वेधून घेतले. पण यावेळी चर्चेचा विषय त्याचे कपडे नसून, रणवीरच्या व्हिडिओच्या बॅकग्राउंडमध्ये वाजणारे गाणे होते.
रणवीर सिंगचा एक व्हिडिओ व्हायरल भयानीने त्याच्या अधिकृत इंस्टाग्रामवरून पोस्ट केला आहे. व्हिडिओमध्ये रणवीर सिंग पांढरा टी-शर्ट आणि मरून रंगाचा प्रीटेंड पायजमा घातलेला दिसत आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी त्याने डार्क चष्मा घातला आहे. तसेच, दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या (Sushant Singh Rajput) ‘राबता’ चित्रपटातील ‘एक वारी आ भी जा’ हे गाणे रणवीरच्या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडमध्ये वाजत आहे. (fans got angry after listening to sushant singh rajput song on ranveer singh video)
रणवीर सिंगच्या व्हिडिओमध्ये हे गाणे वाजताना पाहणे, सुशांतच्या चाहत्यांना अजिबात आवडले नाही. व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहते संतापले आहेत. या व्हिडीओवर चाहत्यांच्या खूप कमेंट्स येताना दिसत आहेत. एका चाहत्याने लिहिले, “हे सुशांत सिंग राजपूतचे गाणे आहे.” दुसरीकडे, रणवीरचा लूक पाहून एका व्यक्तीने त्याला “जोकर” असेही म्हटले. सुशांतच्या आणखी एका चाहत्याने लिहिले, “हे गाणे फक्त आणि फक्त सुशांतचे आहे… इतर कोणासाठीही वापरू नका.” तर एक जण म्हणाला, “या छपरीला सुशांत भाईचे गाणे लावू नका,”
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर रणवीरचे या वर्षात अनेक चित्रपट लाइनमध्ये आहेत. तो लवकरच त्याच्या आगामी ‘जयेशभाई जोरदार’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटातील त्याची व्यक्तिरेखा वडिलांची असू शकते. याशिवाय तो ‘रॉकी और रानीकी प्रेम कहानी’ आणि ‘बैजू बावरा’ या चित्रपटातही दिसणार आहे. ‘बैजू बावरा’ या चित्रपटात रणवीरसोबत आलिया भट्टही (Alia Bhatt) दिसणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा