Thursday, July 18, 2024

रणवीर सिंगच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ दमदार दिग्दर्शकासोबत करणार काम

प्रसिद्ध दिग्दर्शक मनीष शर्मा (Manish Sharma) सध्या त्याच्या ‘टायगर ३’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. याच मनीष शर्मा यांनी त्यांच्या ‘बँन्ड बाजा बारात’ चित्रपटातून रणवीर सिंग (Ranveer Singh) सारखा प्रतिभावान अभिनेता या चित्रपट जगताला दिला होता. या चित्रपटाच्या यशानंतर या दोघांनीही आपल्या करिअरमध्ये जोरदार यश मिळवले आहे. सध्या रणवीर सिंग त्याच्या एकापेक्षा एक दर्जेदार चित्रपटांमुळे यशस्वी ठरत आहे तर दिग्दर्शक मनीष शर्माही सलमान, शाहरुख सारख्या दिग्गज अभिनेत्यांसोबत चित्रपट तयार करण्यात व्यस्त आहे. आता लवकरच ही हिट जोडी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवायला ‘जयेशभाई जोरदार’ नावाचा नवीन चित्रपट घेऊन येत आहे.

अभिनेता रणवीर सिंग आणि मनीष शर्मा तब्बल ११ वर्षानंतर ‘जयेशभाई जोरदार’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यांच्या या चित्रपटाची चाहत्यांना जोरदार उत्सुकता लागली आहे. सुपरस्टार रणवीर सिंगचा हा चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन तर करेलच, त्यासोबतच अनेक नवीन प्रयोग पहिल्यांदाच या चित्रपटातून प्रेक्षकांंना पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेल्या मनीष शर्मा यांनीच चित्रपटाचा दमदार ट्रेलर तयार केला आहे. ज्याची प्रेक्षकांना जोरदार उत्सुकता लागली होती.

समोर आलेल्या माहितीनुसार, या चित्रपटासाठी मनिष शर्मा यांनी अनेक दिग्गज दिग्दर्शकांना एकत्रित केले आहे. ज्यामध्ये अनेक दमदार चित्रपटांची निर्मिती केलेल्या आदित्य चोप्रा सारख्या अनेक उमद्या लोकांचा समावेश आहे. तर रणवीर सिंगच्या अभिनयाने या चित्रपटाला आणखीनच लोकप्रियता मिळणार आहे. अशा प्रकारचा पहिलाच प्रयोग प्रेक्षकांना पाहायला मिळणार असल्याचेही मत अनेकांनी व्यक्त केले आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरची अनोखी संकल्पना त्यांनी मांडली आहे. यामधून त्यांनी आपला संदेश लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे.

याबद्दल बोलताना ते म्हणतात की, “मला अशा प्रकारचा चित्रपट तयार करण्याची संधी मिळाल्याने मी खूप आनंदी आहे. रणवीर सिंग चांगला अभिनेता आहे, हे मला तेव्हापासूनच समजले होते. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाने मला थक्क केले आहे त्यामुळे हा चित्रपट यशाचे शिखर गाठणार आहे यात काहीही शंका नाही. त्याच्यासोबत या चित्रपटात शालिनी सारखी उमदी अभिनेत्री आहे. तसेच चित्रपटाची प्रमुख कमान दिव्यांगांच्या खांद्यावर आहे.” आता या बहुचर्चित चित्रपटाची प्रेक्षकांना जोरदार उत्सुकता लागली आहे. हा चित्रपट १३ मे ला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा –

हे देखील वाचा