Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

हातात दारूचा ग्लास घेऊन ‘या’ महिलेसोबत पार्टी करताना दिसले RGV; कॅमेऱ्यासमोर केलं ‘असं’ काही

चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक राम गोपाल वर्मा (Ram Gopal Varma) यांचा एक लेटेस्ट व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, जो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये राम गोपाल वर्मासोबत दिसणार्‍या महिलेची सर्वत्र चर्चा होत आहे. राम गोपाल वर्मा काही दिवसांपूर्वी ६० वर्षांचे झाले आहेत. त्यांनी त्यांचा ६०वा वाढदिवस त्यांच्या जवळच्या लोकांसोबत मोठ्या थाटामाटात साजरा केला

साजरा केला वाढदिवस
चित्रपट निर्मात्याने हैदराबादमधील एका पबमध्ये आपल्या चित्रपटाच्या टीमसोबत वाढदिवस साजरा केला. वाढदिवसाला त्यांचे माजी सहाय्यक आणि दिग्दर्शक पुरी जगंध आणि प्रोडक्शन पार्टनर चार्मे कौर यांसारख्या काही टॉलिवूड सेलिब्रिटींनी देखील हजेरी लावली होती. एक मोठा केक कापून राम गोपाल वर्मा यांनी त्यांचा वाढदिवस साजरा केला. (ram gopal varma late night party hard with naina ganguly)

राम गोपाल वर्मा यांच्या व्हायरल व्हिडिओबद्दल सांगायचे झाले तर, ते अभिनेत्री नैना गांगुलीसोबत (Naina Ganguli) अतिशय रंगतदार स्टाईलमध्ये दिसत आहेत. राम गोपाल वर्माच्या एका हातात दारूचा ग्लास आहे, तर दुसरीकडे नैना त्यांना किस करून वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसत आहे. लाल रंगाच्या साडीत अभिनेत्री खूपच हॉट दिसत आहे. अशा परिस्थितीत त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

राम गोपाल वर्माचे चित्रपट
दिग्दर्शक राम गोपाल वर्मा हे वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट बनवण्यासाठी ओळखले जातात. RGV चे चाहते वेगळे आहेत आणि ते त्यांच्या चित्रपटांची वाट पाहत असतात. भारतात पहिल्यांदाच एका लेस्बियन प्रेमकथेवर बनलेला राम गोपाल वर्माचा सर्वात वादग्रस्त चित्रपट ‘खतरा: डेंजरस’ अखेर ८ एप्रिल २०२२ रोजी थिएटरमध्ये दाखल झाला आहे. नैना गांगुलीही राम गोपाल वर्माच्या या चित्रपटाचा भाग आहे आणि ती त्यांच्या खूप जवळची देखील आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा