Friday, February 3, 2023

The Kashmir Files | ‘मी चित्रपटाचा द्वेष करतो’, राम गोपाल वर्मांनी दिली चकित करणारी प्रतिक्रिया

सध्या देशभरात विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri)  यांच्या ‘द काश्मिर फाइल्स’ चित्रपटाचीच चर्चा सुरू आहे. प्रदर्शनाच्या आधीपासूनच हा चित्रपट सगळीकडे चर्चेत आला होता. सध्या देशभरात या चित्रपटाला तुफान प्रतिसाद मिळताना दिसत आहे. काही दिवसांपुर्वी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या चित्रपटाचे कौतुक केले होते. १९९०च्या काळात झालेल्या काश्मिरी पंडितांच्या अन्याय आणि अत्याचारावर हा चित्रपट आधारित आहे. या चित्रपटाचे सर्वस्तरांतून कौतुक होत असताना प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा (Ram Gopal Varma) यांनी या चित्रपटाबद्दल मत व्यक्त व्यक्त केले आहे. 

‘द काश्मिर फाइल्स’ चित्रपट पाहिल्यानंतर दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. यासाठी त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ते म्हणतात की, “मला काश्मिर फाइल्स चित्रपटाचा प्रचंड राग आला आहे. कारण यामुळे मी वाचलेले, विचार केलेले सगळे भ्रम नष्ट झाले आहेत. आता मी याबद्दल पून्हा विचार करु शकत नाही, तसेच मला हा चित्रपट कसा बनवायला पाहिजे होता, असेही सांगण्याची गरज राहिली नाही. त्यामुळेच मला या चित्रपटाचा राग आला आहे.” या शब्दात राम गोपाल वर्मा यांनी चित्रपटाचे कौतुक केले आहे.

याबद्दल पुढे बोलताना ते म्हणाले की, “दिग्दर्शन असो अभिनय कौशल्य असो किंवा पटकथा असो या सगळ्यांचा मी द्वेष करतो. कारण यामुळे मला तयार केले आहे, अनेक निर्मात्यांना तयार केले आहे. माझी सगळ्या निर्मात्यांना विनंती आहे की, आपल्याला आपली ओळख विसरून काश्मिर फाइल्सची निर्मिती पाहायला हवी. कमीत कमी आपल्यापैकी कोणालाही हा चित्रपट तयार करण्याची संधी मिळाली तर मला नाही वाटत की आपण याचप्रमाणे विश्वास संपादन करु शकु. त्यामुळेच मी या चित्रपटाचा द्वेष करतो. पण विवेक अग्निहोत्रीवर खूप प्रेम करतो.” अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

राम गोपाल वर्मा यांचा हा व्हिडिओ शेअर करत विवेक अग्निहोत्री यांनी “राम गोपाल वर्मा तुम्ही द काश्मिर फाइल्स चित्रपटाचा द्वेष करता म्हणूनच मी तुमच्यावर प्रेम करतो”  अशी प्रतिक्रिया दिली आहे. सध्या दोन्ही दिग्गजांचा हा संवाद सगळीकडे चर्चेत आला आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा –

हे देखील वाचा