अभिनेता विवियन डिसेना (Vivian Dsena) आणि वाहबिज दोराबजी (Vahbiz Dorabjee) यांच्या लग्नाची चांगलीच चर्चा रंगली होती. मात्र त्यांचे हे नाते जास्त काळ टिकू शकले नाही. मात्र आता वाहबिजसोबत ब्रेकअप झाल्यानंतर विवियन त्याच्या आयुष्यात व्यक्त झाला असून, त्याला त्याचे खरे प्रेमही मिळाले आहे. त्याच्या या नवीन प्रेयसीसोबत तो विवाह करणार असल्याचेही वृत्त समोर आले आहे. मात्र सगळ्यात रंजक कथा म्हणजे, ज्या मुलीच्या तो प्रेमात आहे, ती चक्क त्याचीच एक फॅन आहे. काय आहे या प्रेमप्रकरणाची कथा चला जाणून घेऊ.
अभिनेता विवियन डिसेनने पहिल्यांदाच त्याच्या प्रेमप्रकरणाची जाहीर कबुली दिली आहे. इतकेच नव्हे, तर दोघे लग्न करणार असल्याचीही माहिती त्याने सांगितली आहे. नौरान अली असे या मुलीचे नाव असून ती विवियनची मोठी फॅन आहे. तसेच ती पत्रकारिताही करते. नौरान आणि विवियन लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. त्यांच्या पहिल्या भेटीची कथाही खूपच रंजक आहे. नौरानने अभिनेता विवियनला एका मुलाखतीसाठी संपर्क साधला होता. यामुळेच त्यांची पहिल्यांदा ओळख झाली. या भेटीनंतर त्यांच्यातील मैत्री वाढत गेली आणि याच मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.
अभिनेता विवियनने त्याच्या या प्रेमप्रकरणाची कबुली देताना सांगितले की, “मी नौरानच्या प्रेमात आहे आणि आम्ही लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहोत. आमची पहिल्यांदा ओळख साडे चार वर्षापूर्वी झाली होती, ज्यावेळी नौरानने मला मुलाखतीसाठी संपर्क साधला होता. मात्र मी या मुलाखतीला तीन महिने नकार देत होतो. तसेच आमच्या प्रेमाची सुरूवात मैत्रीपासून सुरू झाली.”
याबद्दल पुढे बोलताना तो म्हणाला की, “आम्ही सुरूवात मैत्रीच्या नात्याने केली होती मात्र हळुहळु दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडलो. मला एका महिन्यांनी मी तिच्या प्रेमात पडल्याची जाणीव झाली.” त्याचबरोबर नौरानचे कौतुक करताना विवियन म्हणाला की, “ती खूपच संयमी आहे, ज्याची मला गरज आहे. तसेच तिचा प्रामणिकपणाही मला खूप आवडतो. अशा मुली सध्याच्या काळात खूप कमी असतात. त्यामुळे ती माझ्या आयुष्यात आहे, याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो. मी अशाच मुलीच्या शोधात होतो. आता मी माझी फॅमिली तयार करु शकतो.”
त्याचबरोबर नौराननेही सांगितले की, “भारतावर माझे खूप प्रेम आहे आणि विवियन याच देशाचा आहे. त्यामुळे आमची मैत्री जमली. पहिल्याच भेटीत त्याचा साधेपणा आणि नम्रपणा मला खूप आवडला. ज्यामुळे मी त्याच्या प्रेमात पडले.”
तत्पुर्वी अभिनेता विवियनने २०१३ मध्ये वाहबिजसोबत लग्न केले होते. मात्र लग्नाच्या तीनच वर्षात त्यांचा घटस्फोट झाला. आता त्याच्या या नव्या प्रेमप्रकरणाच्या बातमीने तो पुन्हा लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचे निश्चित झाले आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-