अभिनेता विवियन डिसेनाने आणि वाहबिज दोराबजी यांचा घटस्फोट, परस्पर संमतीने संपवले अनेक वर्षांचे नाते


टेलिव्हिजनचा प्रसिद्ध आणि हँडसम अभिनेता विवियन डिसेना आणि त्याची पत्नी वाहबिज दोराबजी यांचा घटस्फोट झाला आहे. या जोडप्याने एक संयुक्त निवेदन जारी करून त्यांचे ७ वर्षांचे नाते संपुष्टात आणल्याची घोषणा केली. विवियन आणि वाहबिज यांनी लग्नाच्या ३ वर्षानंतर वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता आणि तेव्हापासून दोघेही वेगळे राहत होते. मात्र, प्रदीर्घ कायदेशीर लढाईनंतर आता हे जोडपे कायदेशीररित्या वेगळे झाले आहे.

विवियन (Vivian Dsena) आणि वाहबिज (Vahbbiz Dorabjee) यांनी संयुक्त निवेदन जारी करून त्यांच्या घटस्फोटाची माहिती दिली. या निवेदनात दोघांनी घटस्फोटासाठी कोणावरही आरोप केलेला नाही, आणि त्याचे कारणही दिलेले नाही. आपल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, “आम्ही कायदेशीररित्या वेगळे झालो आहोत आणि आता आमचा घटस्फोट झाला आहे. आमच्यामध्ये काय शक्यता आहेत हे पाहण्यासाठी आम्ही वर्षानुवर्षे खूप कठोर परिश्रम केले आणि शेवटी आम्ही या निष्कर्षावर पोहोचलो की, आम्ही आमचे मार्ग वेगळे केले पाहिजेत.”

Vahbbiz & Vivian
Vahbbiz & Vivian

या निवेदनात दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतल्याचेही स्पष्ट केले आहे. हा परस्पर संमतीने घेतलेला निर्णय असून, यामध्ये कोणाचीही बाजू घेण्याची गरज नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कोणावर आरोप करण्याची किंवा आमच्या विभक्त होण्याचे कारण शोधण्याची गरज नाही. ते पुढे म्हणाले की, “आम्ही आमच्या सर्व चाहत्यांना या गोष्टी समजून घेण्याचे आवाहन करतो. आम्ही आमचे नाते खाजगी ठेवले आणि आमच्या वैयक्तिक जीवनावर चर्चा करणे आमच्यासाठी कठीण आहे. चाहत्यांच्या प्रेमातून आणि पाठिंब्याने आम्ही आमचे काम असेच चालू ठेवू अशी आशा आहे.”

विवियन आणि वाहबिज यांनी लग्नाच्या ३ वर्षानंतर वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता आणि तेव्हापासून दोघेही वेगळे राहत होते. मात्र, प्रदीर्घ कायदेशीर लढाईनंतर आता हे जोडपे कायदेशीररित्या वेगळे झाले आहे.

हेही वाचा :

बेगानी शादी मैं ‘मिका’ दिवाना, न बोलवताच लग्नात पोहचले मिका आणि राहुल, त्यांना बघून उडाला कल्ला

‘ही दोस्ती तुटायची नाय’, विकासने दिल्या विशालला भावी आयुष्याच्या शुभेच्छा

टेलिव्हिजन अभिनेत्री पूजा बॅनर्जींचे डोहाळे जेवण झाले संपन्न, फोटो सोशल मीडियावर व्हायरल 


Latest Post

error: Content is protected !!