Monday, December 22, 2025
Home बॉलीवूड ‘मी आलियाचा पती, वचन देतो की…’; अभिनेत्रीच्या मैत्रिणींना हे काय वचन देऊन बसला रणबीर!

‘मी आलियाचा पती, वचन देतो की…’; अभिनेत्रीच्या मैत्रिणींना हे काय वचन देऊन बसला रणबीर!

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) अखेर लग्नबंधनात अडकले आहेत. या स्टार कपलच्या लग्नाला काही दिवस उलटले आहेत, मात्र त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर सातत्याने शेअर होत आहेत. इंटरनेटवर दररोज या जोडप्याशी संबंधित काही फोटो किंवा व्हिडिओ व्हायरल होत आहेत. दरम्यान नुकतेच रणबीर-आलियाच्या लग्नाशी संबंधित एक नवीन फोटो सोशल मीडियावर समोर आला आहे, जो चर्चेचा विषय बनला आहे.

अलीकडेच आलिया भट्टच्या एका खास मैत्रिणीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर लग्नातील एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये रणबीर कपूर आलियाला पत्नी म्हणून स्वीकारताना दिसत आहे. विशेष म्हणजे यासाठी तो हातात प्रतिज्ञापत्र घेऊन दिसला. या पत्रात लिहिले आहे की, “मी, रणबीर, आलियाचा पती, सर्व ब्राइड्समेड्सला १२ लाख देण्याचे वचन देतो.” (picture of ranbir kapoor holding shapath patra goes viral promises to bridesmaids)

हा फोटो सोशल मीडियावर येताच त्याला चाहत्यांना प्रचंड पसंती मिळत आहे. यासोबतच ते यावर आपल्या प्रतिक्रियाही देत ​​आहेत. अभिनेत्रीची जिवलग मैत्रीण तान्याने लग्न समारंभाशी संबंधित अनेक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये रणबीर आणि आलिया लग्नाचा आनंद साजरा करताना दिसत आहेत.

अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांनी १४ एप्रिल रोजी एका खासगी समारंभात एकमेकांसोबत लग्न केले. कपूर कुटुंबीयांचे घर असलेल्या वास्तूमध्ये झालेल्या या लग्नात कुटुंबीयांव्यतिरिक्त काही खास मित्रांनीही हजेरी लावली होती. लग्नानंतर दोघांनी आपल्या इंडस्ट्रीतील मित्रांसाठी घरी एक छोटीशी रिसेप्शन पार्टीही आयोजित केली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा