Monday, May 13, 2024

आलिया भट्टच्या मेहंदी कार्यक्रमात करण जोहरसोबत असे झाले तरी काय, की त्याला घ्यावे लागले उपचार

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाचा फिव्हर आजही लोकांच्या डोक्यावरून उतरण्याचे नाव घेत नाही. सोशल मीडियावर सतत व्हायरल होणारे लग्नाचे फोटो, लग्नाला सामील झालेल्या लोकांकडून सतत सांगण्यात येत असलेले लग्नातील किस्से याचीच चर्चा सर्वत्र सुरु आहे. बॉलिवूडचा सर्वत मोठा दिग्दर्शक आणि निर्माता असलेल्या करण जोहरने या लग्नात अगदी पहिल्या दिवसापासूनच सहभाग घेतला होता. सध्या करण टीव्हीवर ‘हुनरबाज’ या शोमध्ये परीक्षकांची भूमिका साकारत आहे. याच शोच्या सेटवर करणने रणबीर आणि आलिया यांच्या लग्नातील एक भन्नाट किस्सा सर्वांना सांगितला.

या शोचा एका प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये भारती सिंग करण जोहरची टांग खेचताना दिसते. तर परिणीती सर्वांना करणच्या हातावरील मेहंदी दाखवते. करण जोहरच्या हातावर असलेली मेहंदी त्याने त्याची मानसकन्या असलेल्या आलिया भट्टच्या लग्नात लावली असल्याचे तो सांगतो आणि सोबतच एक मजेशीर किस्सा देखील शेअर करतो.

करण या व्हिडिओमध्ये सांगताना म्हणतो, “मी आधीच ठरवले होते की, मी आलियाच्या लग्नात मेहंदी लावणार आहे. मात्र याआधी मी कधीही मेहंदी लावली नव्हती. त्यामुळे ही मेहंदी लावल्यानंतर माझ्यासोबत जे झाले त्याची मला कल्पनाच नव्हती. मेहंदी लावल्यानंतर मला घाम आला आणि तो पुसण्याचा नादात मी हातावर मेहंदी आहे हेच विसरलो आणि त्याच हातानी माझा घाम पुसला. त्यामुळे माझ्या संपूर्ण चेहऱ्यावर मेहंदी लागली. हातावरची मेहंदी देखील पूर्णपणे पसरली गेली. त्यानंतर आलियाच्या मेकअप आर्टिस्टने माझा चेहरा स्वच्छ केला आणि मेहंदी पुसली. त्यानंतर असे काही प्रोडक्ट चेहऱ्यावर लावले गेले ज्यामुळे माझ्या चेहऱ्यावर मेहंदीचा रंग आला नाही.”

करणचा हा किस्सा ऐकून तिथे असणारा प्रत्येक व्यक्ती हसत होता. त्यानंतर भारतीने त्याला चिडवताना म्हटले की, “बरे झाले मेहंदीचा रंग चेहऱ्यावर नाही लागला नाही तर लोकांना वाटले असते की, कोणत्या माणसाने पण खाऊन थुंकले आहे. यावर करणसह सर्वच जोरजोरात हसू लागले. तत्पूर्वी रणबीर आणि आलिया यांनी १४ एप्रिल रोजी मुंबईमध्ये अतिशय खासगी समारंभात लग्न केले. त्यानंतर त्यांनी जवळच्या लोकांसाठी आणि मित्रांसाठी एक रिसेप्शन पार्टी दिली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा- 

हे देखील वाचा