Friday, March 14, 2025
Home मराठी सागर म्हात्रे ठरला इंडियन आयडल मराठीच्या पहिल्या सिझनचा विजेता

सागर म्हात्रे ठरला इंडियन आयडल मराठीच्या पहिल्या सिझनचा विजेता

काही दिवसांपूर्वी टेलिव्हिजनवर अशी माहिती येत होती की, पहिल्यांदाच मराठीमध्ये ‘इंडियन आयडल’ सुरु होत आहे. या नंतर मराठी प्रेक्षकांना तर खूपच आनंद झाला. परंतु खरा आनंद झाला तो महाराष्ट्रातील गल्ली बोळातील, कट्ट्यावरील गायकांना कारण त्यांना आणखी एक नवे व्यासपीठ मिळणार होते. अशीच हसत खेळत मराठीमधील पहिल्या वाहिल्या इंडियन आयडलच्या पर्वाला सुरुवात झाली. एकापेक्षा एक अव्वल गायकांनी यात सहभाग घेतला. परंतु स्पर्धा म्हटल्यावर यात कोणी हरणार तर कोणी जिंकणार हे असतंच. अशातच या पहिल्या पर्वाचा महाअंतिम सोहळा पार पडला आहे आणि महाराष्ट्राला पहिला इंडियन आयडल मिळाला आहे.

पनवेलचा सागर म्हात्रे याने याने विजय मिळवून इंडियन आयडलच्या ट्रॉफीवर त्याचे नाव कोरले आहे. त्याच्या या विजयाने सगळ्यांनाच खूप आनंद झाला आहे. सोनी मराठी वाहिनीवरील फ्रिमेन्टल इंडिया टेलिव्हिजन प्रॉडक्शन्स प्रा. लि. निर्मित ‘इंडियन आयडल मराठी’ या कार्यक्रमाने रसिकांच्या मनात घर केलं. या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा नुकताच पार पडला असून पनवेलचा सागर म्हात्रे विजेता ठरला आहे.

या शोमध्ये महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून स्पर्धक आले होते. यातीलच एक सागर म्हात्रे. सागर हा पेशाने इंजिनिअर आहे. परंतु गायनाची आवड त्याला इथपर्यंत घेऊन आली आहे. त्याच्या गोड अवजाने त्याने सगळ्यांच्या मनावर राज्य केले. एकूण १४ स्पर्धक या शोमध्ये सहभागी झाले होते. यात सागराने त्याच्या मेहनतीच्या आणि जिद्दीच्या जोरावर हे यश मिळवले आहे. सर्व क्षेत्रातून आता त्याचे कौतुक केले जात आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा