Friday, March 29, 2024

टेलिव्हिजनविश्वातील ‘या’ खलनायिका त्यांच्या ग्लॅमरने देतात मुख्य अभिनेत्रींना जोरदार टक्कर

टेलिव्हिजन इंडस्ट्री असो किंवा चित्रपट इंडस्ट्री असो खलनायक, खलनायिका यांच्याशिवाय त्या कलाकृतीला मजा येत नाही. मालिकांमध्ये तर हमखास खलनायक, खलनायिका असतातच. पूर्वीच्या काळी या खलनायकांना असा लूक दिला जायचा जो पाहून प्रेक्षकांना क्षणार्धात समजेल की, हाच या मालिका किंवा सिनेमाचा व्हिलन आहे. तसे टीव्ही क्षेत्रात पाहिले तर लक्षात येईल की, मालिकांमध्ये बहुतकरून खलनायिकाच दाखवल्या जातात. मात्र जसा काळ बदलला तसा या खलनायिकांच्या लूक्समध्ये देखील मोठे बदल करण्यात आले. पूर्वी हेव्ही मेकअप असणाऱ्या खलनायिकांना आता सामान्यच मेकअप केला जातो. त्यांच्या अशा लुक्समुळे त्या मालिकेतील मुख्य अभिनेत्रींना जोरदार टक्कर देताना दिसतात. आजपर्यंत मालिकाविश्वात अशा अनेक ग्लॅमरस खलनायिकांनी त्यांचे वर्चस्व गाजवले आणि आपल्या सौंदर्याने लीड अभिनेत्रींना देखील मागे टाकले. आज आपण अशाच काही क्लासी खलनायिकांबद्दल जाणून घेऊया.

अनुपमा: काव्या उर्फ मदालसा शर्मा :
सध्याच्या घडीला टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील सर्वात टॉपचा शो म्हणून ‘अनुपमा’ हा शो ओळखला जातो. या शोने टीआरपीच्या रेसमध्ये आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. या शोमध्ये अनुपमाला सतत त्रास देणारी काव्या ग्लॅमरच्या बाबतीत तुफान वाहवा मिळवता. भलेही अनुपमा सर्वांची लाडकी असली तरी दिसण्यात काव्या अर्थात मदालसा भाव खाऊन जाते.

कुंडली भाग्यः शर्लिन उर्फ रूही चतुर्वेदी :
कुंडली भाग्य या मालिकेने देखील खूपच लोकप्रियता मिळवली आहे. मालिकेत प्रीता अर्थात श्रद्धा आर्याचा जेवढा दमदार रोल आहे तेवढाच महत्वाचा आणि दमदार रोल शर्लिन म्हणजेच रूही चतुर्वेदीचा आहे. सुंदरता आणि ग्लॅमरच्या बाबतीत ती नेहमीच प्रीताला टक्कर देते.

उडारीयां जस्मिन उर्फ ईशा मालवीय :
‘उडारियां’ ही मालिका देखील चांगलीच लोकप्रिय आहे. या मालिकेत जस्मिन अर्थात ईशा मालवीय नकारात्मक भूमिका साकारताना दिसत असून, तिने तिच्याच बहिणीच्या आयुष्यात वादळं निर्माण केली आहे. ईशा खूपच ग्लॅमरस आणि सुंदर आहे.

ये है मोहब्बतें शगुन उर्फ अनिता हसनंदानी :
आजच्या घडीला जरी ये है मोहब्बते शो बंद झाला असला तरी या शोने अमाप लोकप्रियता मिळवली. मालिकेत दिव्यांका त्रिपाठी मुख्य भूमिकेत होती. मात्र तिची भूमिका अतिशय साधी सरळ आईची होती. तिच्याच सोबत मालिकेत नकारात्मक भूमिकेत दिसली अनिता हसनंदानी, अनिताने तिच्या भूमिकेने मालिकेत चांगलेच ग्लॅमर आणले होते.

कुबूल हैः बिल्लो रानी उर्फ आम्रपाली गुप्ता :
कुबुल है मालिकेत सुरभी ज्योती मुख्य भूमिकेत होती. सुरभीने देखील मालिकेत ग्लॅमरस भूमिका साकारली असली तरी तिच्या ग्लॅमरला तोडीसतोड टक्कर निगेटिव्ह भूमिकेत झळकलेल्या आम्रपाली गुप्ताने दिली. आम्रपालीने अजून बरीच मालिकेत नकारात्मक भूमिका निभावली.

 

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

 

हे देखील वाचा