रणबीर कपूर (Ranbir Kapoor) गेल्या काही दिवसांपासून आलिया भट्टसोबतच्या (Alia Bhatt) लग्नामुळे चर्चेत आहे. आलिया आणि रणबीर जवळपास गेल्या पाच वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. मात्र आलियापूर्वीही रणबीर इतर अभिनेत्रींसोबत रिलेशनशिपमध्ये होता. यामध्ये दीपिका पदुकोणचे (Deepika Padukone) नाव प्रथम येते.
‘बचना-ए-हसीनो’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघे जवळ आले आणि जवळपास दीड वर्ष एकमेकांना डेट केले. नंतर दोघांचे ब्रेकअप झाले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रणबीर दीपिकाला फसवत असताना, तिने त्याला रंगेहाथ पकडले होते. त्यामुळे तिने अभिनेत्यासोबतचे नाते तोडले होते. रणबीरच्या बेवफाईमुळे दीपिका डिप्रेशनमध्ये गेली होती आणि तिला याचा मोठा धक्का बसला होता. अशा परिस्थितीत ब्रेकअपनंतर जेव्हा ती करण जोहरच्या (Karan Johar) चॅट शो ‘कॉफी विथ करण’मध्ये सोनम कपूरसोबत (Sonam Kapoor) पोहोचली होती. तेव्हा तिने न कळत रणबीरवर जोरदार निशाणा साधला होता आणि त्याची खूप खिल्ली उडवली होती. (when deepika padukone mocked ranbir kapoor in a chat show rishi kapoor became furious)
दीपिकाचे हे बोलणे ऐकून रणबीर कपूरचे वडील ऋषी कपूर (Rishi Kapoor) भडकले आणि त्यांनी दीपिका-सोनमला सल्लाही दिला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऋषी कपूर म्हणाले होते की, “माझ्या मुलावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी या अभिनेत्रींनी अशा मुद्द्यांवर बोलावे, जे सर्वांच्या हिताचे असेल.”
पुढे ते म्हणाले, “इतरांची खिल्ली उडवण्यापेक्षा या अभिनेत्रींनी आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित करून समजूतदारपणा दाखवावा. कलीग्सबद्दल बोलून त्यांचा अपमान करून काहीही होणार नाही. सार्वजनिक ठिकाणी कोणावरही चिखलफेक करणे योग्य नाही आणि रणबीर हे कधीही कोणावरही करत नाही.”
दीपिकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर ती शेवटची ‘८३’मध्ये पती रणवीर सिंगसोबत (Ranveer Singh) दिसली होती. तर आगामी ती शाहरुख खानसोबत (Shahrukh Khan) ‘पठाण’ चित्रपटात दिसणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा










