सुपरस्टार अजय देवगण (Ajay Devgan) केवळ त्याच्या अभिनयासाठीच नाही, तर दिग्दर्शनासाठीही ओळखला जातो. त्याने ‘लार्जर दॅन लाइव्ह’, ‘यू मी और हम’, ‘शिवाय’ यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. त्यामुळेच त्याच्या ‘रनवे ३४’ कडून प्रेक्षकांना मोठ्या अपेक्षा आहेत. हा चित्रपट या आठवड्यात ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. अजय देवगण व्यतिरिक्त ‘रनवे ३४’ मध्ये अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि रकुल प्रीत सिंग (Rakul Preet Singh) यांच्याही भूमिका आहेत.
२९ एप्रिल रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाला सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC) कडून प्रमाणपत्र मिळाले आहे. विशेष म्हणजे, अजय देवगणच्या ‘रनवे ३४’ ला U/A प्रमाणपत्र आणि झिरो कटसह क्लिअर करण्यात आले आहे. (runway 34 cast and crew release date box office collection box office prediction budget)
कशावर आधारित आहे ‘रनवे ३४’?
अहवालानुसार, ‘रनवे ३४’ वास्तविक जीवनातील घटनेवर आधारित आहे, ज्यात विमानतळावर विमान उतरवण्याच्या संघर्षाचे चित्रण केले आहे. हा चित्रपट २९ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार असून, त्याची टायगर श्रॉफच्या (Tiger Shroff) ‘हिरोपंती २’शी टक्कर होणार आहे. प्रमाणपत्रात म्हटल्याप्रमाणे, चित्रपटाची लांबी १४८ मिनिटे आहे. म्हणजेच ‘रनवे ३४’ २ तास २८ मिनिटांचा आहे.
१०० कोटींपेक्षा कमी बजेटमध्ये बनलाय चित्रपट
‘रनवे ३४’च्या एकूण बजेटची माहिती चित्रपट निर्मिती कंपनीने सार्वजनिक केलेली नाही . मात्र, मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘रनवे ३४’ १०० कोटी रुपयांपेक्षा कमी बजेटमध्ये बनवण्यात आला आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा