Sunday, January 18, 2026
Home बॉलीवूड पहिली घरात असताना देखील ‘या’ बॉलिवूड कलाकारांनी दुसरीसोबत लग्न करुन थाटला संसार

पहिली घरात असताना देखील ‘या’ बॉलिवूड कलाकारांनी दुसरीसोबत लग्न करुन थाटला संसार

हिंदी मनोरंजन जगतात फक्त चित्रपटातीलचं प्रेमप्रकरणे नाही तर या क्षेत्रातील दिग्गजांची प्रेमप्रकरणेही चांगलीच चर्चेत येत असतात.  लग्न होणे आणि अगदी काही वर्षात घटस्फोट होणे या गोष्टी बॉलिवूडच्या जगतात अगदीच अती सामान्य समजल्या जातात. हिंदी चित्रपट जगतात असे अनेक  दिग्गज कलाकार आणि दिग्दर्शक आहेत ज्यांनी विवाहित असूनही दुसरे लग्न करत सर्वांनाच धक्का दिला होता. त्याचप्रमाणे दुसरे लग्न करणाऱ्या या कलाकारांनी पहिल्या पत्नीला घटस्फोटही दिला नव्हता. कोणते आहेत ते कलाकार चला जाणून घेऊ. 

पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता दुसरे लग्न करणाऱ्या दिग्दर्शकांच्या यादीत अभिनेता सलमान खानच्या वडिलांचे नाव घेतले जाते. दिग्दर्शक सलिम खान यांचा विवाह सलमा खानसोबत झाला होता. मात्र काही काळाने ते हेलनच्या प्रेमात  पडले आणि त्यांनी सलमा यांना घटस्फोट न देताच हेलनसोबत लग्न केले. इतकेच नव्हेतर ते तिघे आजही एकाच घरात सोबत राहतात. त्याचबरोबर प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट्ट यांनीही किरण भट्टसोबत विवाहित असतानाच घटस्फोट न देताच सोनी राजदानसोबत लग्न केले होते.

या यादीमध्ये प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र यांच्याही नावाचा समावेश होतो. हिंदी चित्रपट जगतातील सर्वात प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र आणि ड्रिम गर्ल हेमा मालिनी यांची लवस्टोरी सर्वांनाच माहित आहे. मात्र हेमा मालिनी यांच्या प्रेमात पडण्याआधी धर्मेंद्र यांचे लग्न प्रकाश कौर यांच्याशी झाले होते. प्रकाश कौर यांना घटस्फोट न देताच धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्याशी विवाह केला. त्याचप्रमाणे प्रसिद्ध अभिनेते राज गब्बर यांचेही पहिले लग्न नादिरासोबत झाले होते. त्यांंनीही नादिराला घटस्फोट न देताच अभिनेत्री स्मिता पाटीलसोबत विवाह केला होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा