Sunday, February 23, 2025
Home साऊथ सिनेमा ‘केजीएफ’ आणि ‘पुष्पा’च नव्हे, तर ‘या’ दाक्षिणात्य चित्रपटांचेही चाहते आहेत हिंदी प्रेक्षक

‘केजीएफ’ आणि ‘पुष्पा’च नव्हे, तर ‘या’ दाक्षिणात्य चित्रपटांचेही चाहते आहेत हिंदी प्रेक्षक

भारतीय चित्रपटसृष्टीत सध्या दाक्षिणात्य चित्रपटांचे वारे वाहत आहेत. गेल्या काही वर्षांत साऊथच्या एक, दोन नव्हे, तर तीन चित्रपटांनी जगभरात बक्कळ कमाई केली आहे. ‘पुष्पा द राइज’, ‘आरआरआर’ आणि त्यानंतर ‘केजीएफ चॅप्टर २’ या तिन्ही चित्रपटांच्या कमाईने अनेक विक्रम मोडले आहेत. अशा परिस्थितीत आजच्या काळात भारतीय चित्रपटसृष्टीत साऊथचे चित्रपट चालत असल्याचे सर्वांचे म्हणणे आहे. पण दक्षिणेत असे काही चित्रपट आहेत, जे केवळ दक्षिण भारतातच नव्हे तर हिंदी प्रेक्षकांचेही ऑल टाईम फेव्हरेट मानले जातात. हे चित्रपट पाहणे म्हणजे नेहमीच प्रेक्षकांसाठी पर्वणी मानली जाते. अशाच काही चित्रपटांबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत.

जनता गॅरेज
‘जनता गॅरेज’ हा एक अ‍ॅक्शन चित्रपट आहे, जो तेलगू भाषेत २०१६ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात ज्युनियर एनटीआर, समंथा रुथ प्रभू, मोहनलाल यांच्यासह अनेक कलाकार दिसले. चित्रपटाची कथा ‘जनता गॅरेज’ भोवती फिरत असल्याचे दिसते, ज्याची मालकी प्रथम मोहनलाल यांच्याकडे होती आणि ते आपल्या साथीदारांसह लोकांना मदत करतात. यानंतर ज्युनियर एनटीआर मोहनलालची जागा घेतो. चित्रपटात जबरदस्त ऍक्शनसह एक मजेदार फॅमिली ड्रामाही आहे.

मेरी जंग: वन मॅन आर्मी
‘मेरी जंग: वन मॅन आर्मी’ हा नागार्जुनच्या सुपरहिट चित्रपटांपैकी एक आहे, ज्याची क्रेझ केवळ दक्षिण इंडस्ट्रीतच नाही तर हिंदी प्रेक्षकांमध्येही पाहायला मिळाली. या चित्रपटात नागार्जुनसोबत साऊथ अभिनेत्री ज्योतिका दिसली होती. हा चित्रपट गणेश (मास) आणि अंजलीच्या प्रेमकथेवर आधारित आहे, परंतु दोघांच्या प्रेमकथेत खलनायकाचे काम अंजलीचे कुटुंब करतात, जे गुंड आहेत आणि ते गणेशचा भाऊ आदिलाही मारतात. या चित्रपटात भरपूर ऍक्शन आहे.

डॉन नंं. १
हा चित्रपट देखील नागार्जुनचा आहे, ज्यामध्ये अभिनेता एका डॉनची भूमिका करतो जो नेहमी गरीबांना मदत करतो. एवढेच नाही तर तो नेहमी आपल्या देशासाठी उभा असतो. चित्रपटात नागार्जुन फिरोजची भूमिका साकारणाऱ्या केली दोर्जीला भेटतो. दोघांचे जबरदस्त ऍक्शन सीन्स चाहत्यांना खूश करण्यासाठी पुरेसे आहेत. या चित्रपटात अनुष्का शेट्टी देखील आहे.

इंद्र: द टायगर
हा साऊथ इंडस्ट्रीतील सुपरहिट चित्रपटांपैकी एक आहे, ज्यामध्ये चिरंजीवीने आपल्या अ‍ॅक्शनने सर्वांना आश्चर्यचकित केले होते. चित्रपटात दोन कुटुंबांचे वैर दाखवण्यात आले आहे. एका बाजूला चिरंजीवी आणि दुसऱ्या बाजूला मुकेश ऋषी. मात्र, सोनाली बेंद्रे आणि आरती अग्रवाल यांच्यामुळे या चित्रपटातील रोमँटिक अँगल जोडला जातो. दोघेही चिरंजीवीच्या प्रेमात पडतात.

मघधीरा
साल २००९ मध्ये रिलीझ झालेला ‘मघधीरा’ हा एक ऍक्शन चित्रपट आहे, ज्यामध्ये रोमँटिक कथा जोडण्यात आली आहे. या चित्रपटात राम चरण आणि काजल अग्रवाल मुख्य भूमिकेत आहेत आणि दोघांची दुहेरी भूमिका आहे. चित्रपटात दोघांचा पुनर्जन्म आहे आणि या पुनर्जन्मामुळे दोघांची प्रेमकहाणी पूर्ण होत असल्याचे दाखवण्यात आले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा