Friday, March 29, 2024

कॅटरिना कैफच्या रोमॅंटिक व्हायरल फोटोमुळे ‘या’कारणामुळे सलमान खानला नेटकऱ्यांनी केले ट्रोल

बॉलिवूडची नुकतीच लग्न झालेली जोडी कॅटरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशल (Vicky Kaushal) दोघेही सोशल मीडियावर सतत सक्रिय असतात. दोघांचे अनेकदा क्यूट, रोमॅंटिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. ज्यावर त्यांच्या चाहत्यांच्या  जोरदार प्रतिक्रिया पाहायला मिळतात. अलिकडेच अभिनेत्री कॅटरिना कैफने पती विकी कौशलसोबतचा असाच एक फोटो शेअर केला आहे ज्यामुळे नेटकऱ्यांनी सलमान खानला ट्रोल करण्यास सुरूवात केली आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण चला जाणून घेऊ.

अभिनेता सलमान खान आणि कॅटरिना कैफचे प्रेमप्रकरण सिने जगतात चांगलेच गाजले होते. अनेक वर्ष दोघेही एकमेकांसोबत रिलेशनमध्ये होते. त्यावेळी दोघेही लग्न करणार असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. मात्र त्यानंतर दोघांचे ब्रेकअप झाल्याच्या बातम्या समोर येऊ लागल्या. त्यानंतरच कॅटरिना आणि विकी कौशलचे प्रेमप्रकरण सुरू झाले. आणि काही काळाने त्यांनी लग्नही केले.यानंतरच नेटकऱ्यांनी सलमान खानला जोरदार ट्रोल केले होते. आता पून्हा एकदा कॅटरिना कैफने शेअर केलेल्या रोमँटिक फोटोमुळे नेटकऱ्यांनी सलमान खानचे रडके इमोजी पोस्ट करत जोरदार खिल्ली उडवली आहे. तसेच सलमान खानला कॅटरिनाने धोका दिल्याच्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

सध्या तिचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये अभिनेत्री कॅटरिना कैफ आणि विकी कौशल दोघेही स्विमिंग पूलमध्ये रोमॅंटिक पोझ देताना दिसत आहेत. या फोटोमध्ये पांढऱ्या रंगाच्या बिकीनीमध्ये कॅटरिना खूपच मनमोहक आणि बोल्ड दिसत आहे. तर शर्टलेस विकी कौशलही जोरदार पोझ देताना दिसत आहे. दरम्यान नेटकऱ्यांनी ट्रोल केले असले तरी सलमान खान आणि कॅटरिनाची मैत्री आजही कायम आहे. लवकरच ते दोघेही आगामी टायगर ३ चित्रपटात झळकणार आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा