Friday, December 13, 2024
[aioseo_breadcrumbs]

अभिमानास्पद! केवळ भारतातच नव्हे, तर ‘शेर शिवराज’ला जगभरात मिळतोय उत्स्फुर्त प्रतिसाद

सध्या सिनेमागृहात दिग्पाल लांजेकर यांचा ‘शेर शिवराज’ चित्रपट जोरदार कमाई करताना दिसत आहे. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासूनच या चित्रपटाला प्रेक्षकांचा अभूतपुर्व प्रतिसाद पाहायला मिळाला होता. जगभरातील प्रेक्षकांना या चित्रपटाची उत्सुकता लागली होती. आता चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झाल्यानंतरही त्याला प्रेक्षकांनी पाहायला गर्दी केली होती. त्यामुळेच या चित्रपटाने कमाईचे नवनवीन रेकॉर्ड केले आहेत. चित्रपटाने तिसऱ्या आठवड्यातही कमाईची घोडदौड अशीच कायम ठेवली आहे.

मराठी सिने जगतात सध्या अनेक नाविण्यपूर्ण विषयांवरील चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या चित्रपटांंना प्रेक्षकांनी जोरदार प्रतिसाद दिला. दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या ऐतिहासिक चित्रपटांच्या मालिका तर प्रचंड गाजल्या. ‘पावनखिंड’, ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’ नंतर आता त्यांचा ‘शेर शिवराज’ चित्रपटही बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसत आहे. या चित्रपटाने सलग तिसऱ्या आठवड्यातही कमाईचा आलेख असाच उंचावला आहे.

पहिल्या दोन आठवड्यात या चित्रपटाचे देशात १००० शो सुपरहीट केले आहेत. तर परदेशात हा आकडा १००च्या घरात गेला आहे. तसेच टिकीटींग पोर्टलवरही या चित्रपटाला तब्बल ९७% इतके रेटिंग मिळाले आहे. सध्या भारताबाहेर या चित्रपटाला १०० पेक्षा जास्त सिनेमागृहांमध्ये पाहिले जात आहे. यामध्ये  जर्मनीतील १०, युएसएमधील २०, , दुबईमधील १०, युकेमधील ५, कॅनडातील ५, ऑस्ट्रेलियातील ४ शहरांचा समावेश आहे. याखेरीज फिनलॅन्डमध्ये ३, युएई, बहारीन, ओमानमध्ये ५ शोज सुरू आहेत. हा आकडा आजवरच्या मराठी चित्रपटांच्या इतिहासातील खूप मोठा आहे. त्यामुळेच हा चित्रपट जगभरात सुपरहिट ठरणार असल्याचे दिसत आहे. चित्रपटात शिवरायांच्या असामान्य शौर्याची कथा दाखवण्यात आली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा