कृष्णा अभिषेक (Krushna Abhishek) जेव्हा इंडस्ट्रीत आला, तेव्हा प्रेक्षकांनी त्याच्यामध्ये मामा गोविंदाची (Govinda) छबी पाहिली. डान्सपासून ते एक्सप्रेशन्सपर्यंत लोक कृष्णाचे खूप कौतुक करायचे. मामा-भाच्याची जोडी स्टेजवर यायची, तेव्हा प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलून यायचा. मात्र जेव्हापासून या दोघांच्या कुटुंबात तेढ निर्माण झाली आहे, तेव्हापासून दोघेही एकमेकांसमोर येण्याचे टाळताना दिसत आहेत. गोविंदा जेव्हा जेव्हा ‘द कपिल शर्मा शो’मध्ये पत्नी सुनीतासोबत यायचा, तेव्हा कृष्णा अभिषेक त्या एपिसोडमधून गायब असायचा. पण आता कृष्णाने आपले मन मोकळेपणाने व्यक्त केले आहे आणि सांगितले आहे की, तो प्रत्येक क्षणी मामा गोविंदासोबत घालवलेला वेळ किती मिस करतो.
मनीष पॉलसमोर व्यक्त झाला कॉमेडियन
कॉमेडियन कृष्णा अभिषेक नुकताच मनीष पॉलच्या (Manish Paul) पॉडकास्टचा एक भाग बनला होता. यावेळी होस्ट मनीष पॉलने त्याला त्याच्या आणि मामा गोविंदा यांच्यातील दीर्घकाळ चाललेल्या मतभेदाबद्दल प्रश्न विचारला, ज्यामुळे कृष्णा खूपच भावूक झाला. आपला मित्र आणि होस्ट मनीष पॉलसोबत आपली भावना शेअर करत कृष्णा म्हणाला की, जेव्हाही तो त्याच्या मामाबद्दल काही बोलतो, तेव्हा त्यात काट-छाट केली जाते. त्यानंतर मनीषने कृष्णाला आश्वासन दिले की, तो त्याच्या बोलण्यातील काहीही कट करणार नाही. (krushna abhishek spoke about his rift with govinda)
भावूक झाला कृष्णा
भावूक झालेल्या कृष्णाने मनीष पॉलसोबत आपल्या भावना शेअर केल्या आणि गोविंदाला त्याचा संदेश दिला. यावेळी कॉमेडियन म्हणाला, “माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे आणि मला प्रत्येक क्षणी तुमची आठवण येते. कोणत्याही बातम्या किंवा माध्यमात जे लिहिले गेले आहे, त्यावर तुम्ही कधीही विश्वास ठेवू नका. माझ्या मुलांनी माझ्या मामासोबत खेळावे, अशी माझी इच्छा आहे. मला हे देखील माहित आहे की, ते देखील मला खूप मिस करतात.” एकीकडे कृष्णा अभिषेक उघडपणे आपल्या मामासोबतच्या भांडणाबद्दल बोलतो, तर दुसरीकडे गोविंदा अनेकदा त्याबद्दल बोलणे टाळताना दिसतो.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा