Saturday, January 28, 2023

नवीन गाण्यामुळे ट्रोल झालेल्या गोविंदाच्या समर्थनात आला भाचा कृष्णा अभिषेक, म्हणाला…

बॉलिवूडचा सुपरस्टार अभिनेता गोविंदा (Govinda) सध्या चर्चेत आहे. त्याने आपल्या काळात जबरदस्त चित्रपट देऊन प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. बॉलिवूड विश्वात त्याच्याकडे एक प्रतिभावान अभिनेता म्हणून पाहिले जाते. नुकताच गोविंदाचा ‘हॅलो’ हा म्युझिक अल्बम प्रदर्शित झाला आहे. या गाण्यामुळे गोविंदा चांगलाच ट्रोल होत आहे. त्याचे गाणे प्रेक्षकांना अजिबात आवडले नाही आणि त्यामुळेच या गाण्याच्या कमेंट बॉक्समध्ये सर्वजण अभिनेत्यावर टीका करत आहेत. मात्र आता त्याचा भाचा आणि कॉमेडियन कृष्णा अभिषेक (Krushna Abhishek) गोविंदाच्या समर्थनार्थ पुढे आला आहे. अनेक दिवसांपासून गोविंदा आणि कृष्णाच्या कुटुंबात तणावाचे वातावरण होते. मात्र आता गोविंदा अडचणीत सापडल्याने कृष्णा अभिषेकने आपल्या मामाला वाचवण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

कृष्णा अभिषेकने त्याचा मामा गोविंदाच्या नवीन गाण्यावर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्याने फक्त दोन शब्द बोलले, पण या दोन शब्दांनी त्याने ट्रोलर्सची बोलती बंद करण्याचे काम केले आहे. कृष्णा अभिषेक म्हणाला की, “काहीही झाले तरी गोविंदा नेहमीच हिरो नंबर १ असेल.”

गोविंदाने हे गाणे त्याच्या ‘गोविंदा रॉयल्स’ या युट्यूब चॅनलवर प्रदर्शित केले आहे. चाहत्यांना अभिनेत्याचे हे गाणे अजिबात आवडले नाही. कारण या गाण्यात गोविंदा त्याच्या जुन्या म्हणजेच ९० च्या दशकातील स्टाईलमध्ये दिसत आहे. युजर्सना त्याची ही स्टाईल अजिबात आवडली नाही. तो एवढा मोठा स्टार आहे, मग तो सन्मानाने निवृत्ती का घेत नाही, असे अनेकांचे म्हणणे आहे.

त्याचवेळी, एका युजरने लिहिले की, “या सर्वांचे युग संपले आहे. सर आपण ९० मध्ये नाही, तर २०२२ मध्ये जगत आहोत, जागे व्हा.” गोविंदाच्या गाण्यांवर अशा प्रकारच्या कमेंट्स सतत येत आहेत. त्यामुळे अभिनेत्याला त्याचा कमेंट सेक्शन बंद करावे लागले.

गोविंदा आणि कृष्णा यांच्या कुटुंबात तीन वर्षांपासून वाद सुरू असून, यावरून दोन्ही कुटुंबांमध्ये जोरदार वादावादी सुरू आहे. एवढेच नाही, तर गोविंदा पत्नी सुनीता आहुजासोबत कपिल शर्माच्या शोमध्ये पोहोचला तेव्हा कृष्णाने या एपिसोडपासून दूर ठेवले. मात्र कृष्णाच्या या वक्तव्याने दोन्ही कुटुंबीयांना त्यांच्यातील तणाव संपवायचा असल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा